मुंबई: चेन्नई सुपकिंग्स संघासोबत मिळवलेल्या दैदीप्यमान यशानंतर दिल्ली कॅपिटल्स संघाला राजस्थान रॉयल्स संघासोबतच्या सामन्यात अत्यंत वाईट पद्धतीनं पराभवाचा सामना करावा लागला. दिल्ली कॅपिटल्स संघाकडून राजस्थाननं विजय हिसकावला आहे. याचं श्रेय जयदीप आणि ख्रिस मॉरिससह मिलरला आहे. तर दिल्ली कॅपिटल्सची मोठी निराशा झाली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सामन्यात पराभव स्वीकारल्यानंतर ऋषभ पंतने मोठी खंत व्यक्त केली. क्रिस मॉरिसची तुफान बॅटिंग दिल्लीसाठी धोक्याची ठरली. ऋषभ पंत म्हणला की, 'माझ्या मते गोलंदाजांची सुरुवात चांगली झाली पण शेवटी आम्ही राजस्थानच्या खेळाडूंना वर्चस्व गाजवण्याची संधी दिली. आम्ही आणखी चांगली गोलंदाजी करू शकलो असतो. ' 


 पंत म्हणाले की, अक्षर पटेल आणि आणखी एक गोलंदाज कोरोना पॉझिटिव्ह आल्यानं संघात गोलंदाजांची कमतरता मोठी जाणवत होती. याशिवाय आम्ही सामन्यात 10 ते 20 धावा आणखी करू शकलो असतो. या सामन्यासाठी काही सकारात्मक बाजूही आहेत. गोलंदाजांनी चांगली सुरुवात केली. आम्हाला आशा आहे की भविष्यात आम्ही विजय मिळवू. त्यादृष्टीनं पुढील स्ट्रॅटजी तयार करण्याकडे भर देऊ. या सामन्यातून अनेक उणीवा आम्हाला समजल्याची खंतही ऋषभने व्यक्त केली. 


डेव्हिड मिलरनं अर्धशतकी खेळी केली त्यामुळे संघाची सामन्यावर पकड मजबूत झाली. तर शेवटच्या टप्प्यात ख्रिस मॉरिसनं 18 चेंडूमध्ये 36 धावा केल्या यामध्ये 4 चौकारही ठोकले. त्याच्या या कामगिरीमुळे संघाला विजय मिळाला आहे. पंजाब विरुद्ध सामन्यात राजस्थानला पराभव पत्करावा लागला. मात्र दिल्ली कॅपिटल्स विरुद्धच्या सामन्यात राजस्थान 3 विकेट्सनं जिंकलं आहे.