मुंबई: IPLध्ये आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध राजस्थान रॉयल्स यांच्यात मॅच होणार आहे.  मुंबईच्या वानखेडे स्टेडिअमवर हा मुकाबला रंगणार आहे. सध्या बंगळुरू संघाची गाडी IPLच्या ट्रॅकवर सुसाट धावताना दिसत आहे. पहिले तीन सामने एकामागोमाग एक जिंकत आता विजयाचा चौकार मारण्यासाठी निघाली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सध्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघ पॉईंट टेबलमध्ये अव्वल स्थानी आहे . तर राजस्थान रॉयल्स केवळ 1 मॅच जिंकून सातव्या स्थानी आहे. राजस्थानला गेल्या मॅचमध्ये चेन्नईकडून पराभव स्वीकारावा लागला होता.





दुसरीकडे बंगळुरुनं कोलकात्याचा धुव्वा उडवला होता. बंगळुरुचं पारडं राजस्थासमोर जड मानलं जात आहे. बंगळुरुचे ए बी डिव्हिलियर्स आणि ग्लेन मॅक्सवेल तुफान फॉर्मात आहेत. या दोघांना झटपट गुंडाळण्यासाठी राजस्थानचा कॅप्टन संजू सॅमसनला विशेष रणनीती आखावी लागेल. 


बंगळुरुला रोखण्याचं मोठं आव्हान संजूच्या राजस्थानसमोर असणार आहे. राजस्थानला विजय मिळवायचा असेल तर बंगळुरुला कडवी झुंज द्यावी लागेल. आजची मॅच जिंकून विजयी चौकार मारण्याच्या इराद्यानं विराटसेना मैदानात उतरेल. तर बंगळुरुच्या विजयी घोडदौडीला लगाम घालण्याचा राजस्थनाचा मानस असेल. त्यामुळे आजची मॅच चुरशीची होईल अशी अपेक्षा क्रिकेटप्रेमींना आहे.


राजस्थान रॉयल्स संभाव्य प्लेइंग इलेव्हन


जोस बटलर, मनन वोहरा, संजू सॅमसन (कर्णधार/विकेटकीपर), शिवम दुबे, डेव्हिड मिलर, रियान पराग, राहुल तेवतिया, ख्रिस मॉरिस, श्रेयस गोपाल, चेतन सकारिया आणि मुस्तफिजुर रहमान


बंगळुरू संभाव्य प्लेइंग इलेव्हन


विराट कोहली (कर्णधार), देवदत्त पडिक्कल, रजत पाटीदार, ग्लेन मॅक्सवेल, एबी डिव्हिलियर्स (विकेटकीपर), वाशिंगटन सुंदर, शाहबाज अहमद, काइल जेमीसन, हर्षल पटेल, मोहम्मद सिराज आणि युजवेंद्र चहल