मुंबई : कोलकाता नाईट रायडर्सचा (KKR) युवा क्रिकेटर शुभमन गिल अत्यंत खराब फॉर्ममध्ये आहे. फलंदाजीमध्ये तर शुभमन गिल फ्लॉप आहेच, तसेच त्याची फील्डिंगही फारशी चांगली नाही. शनिवारी राजस्थान रॉयल्स संघाने कोलकाता नाईट रायडर्सचा 6 विकेट्सने पराभव केला.


या गोष्टीचा क्रिकेटमध्ये पण उपयोग काय?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

खराब फील्डिंगनंतर शुभमन गिल रागाच्या भरात स्वत: ला शिव्या देताना आणि स्वत: ला काहीतरी बोलतानाही दिसला. शुभमन गिलचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. पण शुभमन गिल याला कोण सांगणार क्रिकेटमध्ये स्वत:वर रागवून चालत नाही, त्याचा येथे काहीही उपयोग नाही. क्रिकेट एकच राग ओळखतो...तुमच्या खेळात सुधारणा आणि जोपर्यंत सुधारणा होत नाही तोपर्यंत तुम्हीच काय क्रिकेटही तुमच्यावर रुसलेलंच असेल.


शुभमन गिलची खराब फील्डिंग


या सामन्यात राजस्थान रॉयल्सविरुद्ध शुभमन गिल 19 चेंडूत 11 धावांवर बाद झाला. राजस्थान रॉयल्सच्या फलंदाजी दरम्यान जेव्हा शुभमन गिल फील्डिंग करत होता, तेव्हा त्याने 13 व्या ओव्हरमधील पाचव्या चेंडूवर राहुल तेवतियाची कॅच घेण्याचा प्रयत्न केला नाही.


तेवतियाला जीवनदान


राहुल तेवतियाने 13 व्या ओव्हरमधील पाचव्या चेंडूवर हवाई शॉट खेळला. बाऊंड्री लाईनवर फील्डिंग करताना गिलला त्याची कॅच घेण्याची संधी होती, परंतु तो चेंडू कोणत्या दिशेने आणि कुठे येईल याचा अंदाज योग्यप्रकारे लावू शकला नाही आणि ती कॅच सुटली, त्यामुळे तेवतियाला मॅचमध्ये जीवनदान मिळाले.


गिल स्वत: ला शिव्या देताना दिसला


खराब फील्डिंगनंतर शुभमन गिल रागाच्या भरात स्वत: ला शिव्या देताना आणि स्वत: ला काहीतरी बोलतानाही दिसला. शुभमन गिलचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.



राजस्थान रॉयल्सने बाजी मारली


स्टार अष्टपैलू ख्रिस मॉरिसच्या तुफानी गोलंदाजीनंतर संजू सॅमसनच्या नेतृत्वाखाली राजस्थान रॉयल्सने शनिवारी खेळल्या गेलेल्या आयपीएल सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सचा 6 विकेटने पराभव केला. टॅास गमावल्यानंतर फलंदाजी करताना कोलकाताचा संघ 20 ओव्हरमध्ये 9 विकेट्सवर 133 धावा करू शकला.