मुंबई: IPLमधील तिसरा सामना कोलकाता विरुद्घ हैदराबात चेपॉक स्टेडिमवर पार पडला. कोलकाता संघाने 10 धावांनी सामना जिंकला. या सामन्यात नितीश राणा आणि राहुल त्रिपाठी यांची भूमिका खूपच महत्त्वाची होती. हैदराबाद संघातील एका फलंदाजाची सोशल मीडियावर चर्चा सुरू आहे. अवघ्या 19 वर्षांच्या या फलंदाजाने आपली करतूद संपूर्ण जगाला दाखवून दिली आहे. त्याची फलंदाजी पाहून भल्याभल्यांनी आश्चर्यानं भुवया उंचावल्या. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हैदराबाद संघाने हा सामना गमावला असेल पण त्यातील फलंदाज अब्दुल समदने सर्वांची मने जिंकली. हैदराबादच्या संघासमोर 188 धावांचं लक्ष होतं. वेगवान गोलंदाज पॅट कमिन्स 19 वी ओव्हर खेळण्यासाठी आला. या ओव्हरच्या दुसऱ्याच चेंडूवर 93 मीटर लांब षटकार ठोकला आहे. इतकंच नाही तर कमिन्सच्या पुढच्या बॉलवर पुन्हा सामदने आपली बॅट फिरवली आणि आणखी एक लांब षटकार ठोकला. 




19 वर्षांच्या या फलंदाजानं आपल्या फलंदाजीची ताकद संपूर्ण जगाला दाखवून दिली. जगातील अव्वल क्रमांकाच्या गोलंदाजानं केलेल्या बॉलिंवर त्याने ज्या पद्धतीनं टपाटप षटकार ठोकले त्याचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. त्याने ठोकलेल्या षटकाराचा व्हिडीओ समोर आला आहे. नेटकऱ्यांनी त्याचं कौतुकही केलं आहे.


2020 मध्ये केकेआर संघानं 15.5 कोटी रुपये देऊन कमिन्सला संघात समाविष्ट करून घेतलं. तो जगातील सर्वात उत्तम वेगवान गोलंदाज आहे. त्याने फेकलेल्या चेंडूवर समदने ज्या पद्धतीनं षटकार ठोकले ते पाहिल्यानंतर तर त्याचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे.