मुंबई : आयपीएल 2021 च्या दुसऱ्या टप्प्यातील (IPL 2021 Phase 2) ) सामने रविवारी 19 सप्टेंबर पासून होणार आहेत. चेन्नई सुपर किंग्स विरूद्ध मुंबई इंडियन्स (Chennai Super Kings vs Mumbai Indians) हा पहिला सामना रंगणार आहे. दोन्ही संघ या सीजनमध्ये 4 वेळा आमने-सामने आले आहेत. (how to watch ipl live for free:)
  
हा सामना जिंकून चेन्नई सुपर किंग्स मुंबईशी बरोबरी साधण्याचा प्रयत्न करणार आहे. दोन्ही टीम प्लेऑफच्या स्पर्धेत अद्यापही टिकून आहेत. सीजनचे उरलेले 31 सामने 27 दिवसांमध्ये खेळले जातील. हे सामने दुबई, अबुधाबी आणि शारजाहमध्ये आयोजित करण्यात येणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कंपन्यांची ऑफर
प्रेक्षकांना आयपीएल 2021 च्या सर्व सामन्यांना मोफत पाहण्याचा आनंद मिळू शकतो. सर्व सामन्यांची लाइव स्ट्रीमिंग स्टार इंडिया नेटवर्कच्या सर्व वाहिन्यांवर करण्यात येणार आहे. तसेच आयपीएल 2021 च्या सर्व सामन्यांचे लाइव स्ट्रीमिंग स्टारचे व्हिडिओ ऑन डिमांड प्लॅटफॉर्म डिज्नी+हॉटस्टारवर पाहू शकतो. डिज्नी+हॉटस्टॉरचे सबस्क्रिप्शन सध्या एअरटेल, वोडाफोन,  जिओ हे टेलिकॉम ऑपरेटर्स काही रिचार्ज ऑफरसोबत फ्री देत आहे. तुम्ही या ऑफरचा फायदा घेऊन सामन्यांचा आनंद घेऊ शकता.


Disney+ Hotstar सबस्क्रिप्शन 
तुम्ही डिज्नी +हॉटस्टारचे वेगळे सबस्क्रिप्शन घेऊनही सामन्यांचा आनंद घेऊ शकता. डिज्नी + हॉटस्टार व्हीआईपी पॅक आहेत ज्यांची सदस्यता एकावर्षासाठी 399 रुपये आहे.