मुंबई : इंडियन प्रीमियर लीग (IPL 2021) मधील फ्रँचायजी टीम सनरायझर्स हैदराबादने शनिवारी घोषणा केली की डेव्हिड वॉर्नरला आयपीएलच्या 14 व्या सत्रात कर्णधारपदावरून काढून टाकले गेले आहे. 2021 च्या उर्वरित हंगामासाठी संघाचे नेतृत्व कोण करेल? सनरायझर्स हैदराबादनेही याचीही घोषणा केली आहे. SRH ने अधिकृत निवेदनात असे म्हटले आहे की, न्यूझीलंडचा संघाचा कर्णधार केन विल्यमसन उर्वरित हंगामात संघाचे नेतृत्व सांभाळेल. सनरायझर्स हैदराबाद सध्या सहा सामने खेळून केवळ 2 गुणांसह सर्वात शेवटच्या स्थानावर आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पुढच्या सामन्यांसाठी प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल होणार आहेत. परदेशातील खेळाडूंमध्ये निश्चितच बदल होईल असे संकेत फ्रँचायझीने दिले आहेत. अशा परिस्थितीत डेव्हिड वॉर्नरला राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यात बाहेर पडावे लागू शकते. अधिकृत निवेदनात सनरायझर्स हैदराबादने म्हटले आहे की, “उद्या होणाऱ्या सामन्यासाठी आणि आयपीएल 2021 च्या उर्वरित हंगामात केन विल्यमसन कर्णधारपदाची सूत्रे हाती घेतील. टीम मॅनेजमेंटने देखील राजस्थान रॉयल्स विरुद्ध होत असलेल्या या सामन्यासाठी परदेशी खेळाडूंच्या संघात निवडीबाबत बदल केले आहे.


सनरायझर्स हैदराबादच्या निवेदनात पुढे असेही म्हटले आहे की, “हा निर्णय सहजपणे घेण्यात आलेला नाही, कारण डेव्हिड वॉर्नरने वर्षानुवर्षे  मोठा प्रभाव पाडला आहे, व्यवस्थापनाचा तो खूप आदर करतो. बाकी, आम्हाला खात्री आहे की डेव्हिड वॉर्नर मैदानात आणि बाहेरही यश मिळवण्यासाठी चांगली कामगिरी करेल." अरुण जेटली स्टेडियमवर रविवारी राजस्थान रॉयल्सचा सामना सनरायझर्स हैदराबाद सोबत होईल. मागच्या सामन्यात या संघाला चेन्नई सुपर किंग्ज (CSK) विरुद्ध सात गडी राखून पराभव स्वीकारावा लागला.