मुंबई: कोरोनामुळे IPL चे सामने स्थगित झाले आहेत. त्यानंतर प्रत्येकाला आपल्या घरी जाण्याच्या सूचना बीसीसीआने दिल्या आहेत. टीम इंडिया आणि चेन्नई सुपर किंग्ज स्टार अष्टपैलू रवींद्र जडेजा आपल्या घरी सुखरुप पोहोचला आहे. काही दिवसांपूर्वी रवींद्र जडेजानं आपला एक खास मित्र गमावला होता. त्याचा लाडक्या अश्चाचं निधन झालं होतं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आता रवींद्र जडेजासाठी कोरोना काळात सर्वात जास्त आधार हा सोबती बनला आहे. या कठीण परिस्थितीत घोड्यांसोबत जडेजा आपला वेळ घालवून कोरोनाचा एकटेपणा कमी करत आहेत. कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे बीसीसीआयने आयपीएल सत्र 2021 अनिश्चित काळासाठी पुढे ढकलले आहे. 





रवींद्र जडेजाने आपल्या घोड्याचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला. 'मला जिथे सुरक्षित वाटतं तिथे मी परत आलो आहे.' असं कॅप्शन देत घोड्याचा फोटो शेअर केला आहे. रवींद्र जडेजाला घोडे खूप जास्त आवडतात. आपली सगळी सुखं-दु:खं तो घोड्यांसोबत शेअर करतो. घरी केल्यानंतर बराच वेळ तो आपल्या या खास दोस्तासोबत घालवणं जास्त पसंत करतो.