मुंबई : टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू आणि सध्याच्या मुंबई इंडियन्सचा खेळाडू हार्दिक पंड्या बराच काळ फिटनेस समस्यांमुळे अडचणीत आहे, ज्यामुळे तो काही सामने देखील खेळू शकलेला नाही. जर हार्दिक पंड्याची प्रकृती पाहिली तर टी -20 वर्ल्ड कममध्ये त्याच्या खेळण्यावर अनेक प्रश्चचिन्ह निर्माण केले जात आहेत. त्यात हा एक असा खेळाडू आहे जो हार्दिक पंड्यासाठी टीम इंडियाचे दरवाजे हळूहळू बंद करत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शार्दुल ठाकूर भारतासाठी कसोटी, एकदिवसीय आणि टी -20 या तीनही प्रकारांमध्ये क्रिकेट खेळतो. तसेच सध्या आयपीएलमध्ये शार्दुल ठाकूर फलंदाजी आणि गोलंदाजीमध्ये आपला चांगला खेळ दाखवत आहे. त्यामुळे हा खेळाडू  हार्दिक पंड्यासाठी धोकादायक खेळाडू ठरु शकतो ज्यामुळे हार्दीकच्या टीम इंडियामधील जागेला धक्का लागण्याची शक्यता नाकारता येत नाही.


शार्दुलची अप्रतिम कामगिरी पाहता स्वतः कर्णधार विराट कोहलीही आश्चर्यचकित झाला आहे. सध्या भारतीय संघाकडे हार्दिक पंड्याचा पर्याय म्हणून शार्दुल ठाकूर हा खेळाडू आहे, जो संघात अष्टपैलूची भूमिका बजावू शकतो. शार्दुल ठाकूर संघात वेगवान गोलंदाज म्हणून खेळत असला, तरी त्याची फलंदाजीची शैली पाहिली तर त्याने टीम इंडियाचे सामने आणि आयपीएल सामन्यांमध्ये अनेक वेळा स्वतःला सिद्ध केले आहे.


शार्दुल ठाकूरने आतापर्यंत 22 टी -20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 34.50 च्या सरासरीने 69 धावा केल्या आहेत आणि या काळात त्याच्याकडे 197 चा स्ट्राईक रेट आहे, जो टी -20 मध्ये खूप चांगला मानला जातो.


टी -20 वर्ल्डकपमध्ये भारताला मोठा धक्का बसणार आहे


आयसीसीच्या नियमांनुसार भारतीय संघ व्यवस्थापन 10 ऑक्टोबरपर्यंत विश्वचषकाच्या संघात बदल करू शकते. कोरोना नंतर यूएईमध्ये आयपीएल पुन्हा सुरू झाल्यावर हार्दिक पांड्या मुंबईसाठी काही सामन्यांमध्ये खेळला नाही. हार्दिक पंड्या आयपीएल 2021 च्या यूएई लेगमध्ये अजिबात गोलंदाजी करत नाही. परंतु तो आता चांगला फॉर्ममध्ये आला असला तरी, त्याची प्रकृती पाहाता त्याला टीममधून बाहेर देखील ठेवले जाऊ शकते.