मुंबई: विराट कोहलीनं टी 20 फॉरमॅटसाठी आपल्या कर्णधारपदाचा राजीनामा दिला आहे. टी 20 वर्ल्ड कप हा त्याचा कर्णधार म्हणून शेवटचा असणार आहे. त्यानंतर कोहली आपल्या कर्णधारपदावरून पायउतार होणार आहे. कोहलीनं ट्वीट करत यासंदर्भात 16 सप्टेंबरला माहिती दिली. कामाचा ताण असल्याने त्याने आपलं कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला आहे. 32 वर्षांचा दिग्गज खेळाडू कोहली आपल्या फलंदाजीवर फोकस करणार असल्याचं सांगत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोहलीच्या या निर्णयानंतर आता तो RCBच्या कर्णधारपदाचाही राजीनामा देणार का? अशी एक चर्चा सोशल मीडियावर सुरू झाली आहे. त्याच बरोबर कोहलीच्या निर्णयावर अनेक दिग्गजांनी आपलं मत सांगायला सुरुवात केली आहे. कोहलीचे आधीचे प्रशिक्षक राजकुमार शर्मा यांनी देखील आपलं मत सांगितलं आहे.


कोहली आयसीसीची एकही टूर्नामेंट जिंकवून देऊ शकला नाही. त्यामुळे त्याच्यावर दबाव होता. त्याने यामुळे निर्णय घेतला असावा का? असा प्रश्न जेव्हा शर्मांना विचारला तेव्हा त्यांनी याबाबत आपलं मत व्यक्त केलं आहे. कोहली कर्णधारपदी असतानाही त्याची कामगिरी उत्तम राहिली आहे. 


शर्मा यांच्या म्हणण्यानुसार जेव्हा योग्य वेळ येईल तेव्हा कोहली RCB चे कर्णधारपदही सोडू शकतो. मला वाटतं की वेळ आल्यावर कोहली आरसीबीच्या कर्णधारपदाचा राजीनामा देऊ शकतो. तो फलंदाज म्हणून खेळत राहील. हे त्याच्यासाठी चांगले असेल कारण त्यामुळे त्याला त्याच्या फलंदाजीवर लक्ष केंद्रित करण्यासाठी योग्य वेळ मिळेल आणि एकदिवसीय आणि कसोटी स्वरूपांवरही लक्ष केंद्रित करता येईल.


आयपीएलचा दुसरा टप्पा 19 सप्टेंबरपासून सुरू होत आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने पहिल्या टप्प्यात चांगली कामगिरी केली आहे. दुसऱ्या टप्प्यातही ही कामगिरी कायम ठेवतात का? अंतिम सामन्यापर्यंत पोहोचण्यात विराटच्या टीमला पोहोचण्यात यश येत का याकडे चाहत्यांचं लक्ष आहे.