मुंबई : आयपीएलच्या 15 व्या हंगामातील (IPL 2022) सलामीचा सामना हा कोलकाता विरुद्ध चेन्नई (KKR vs CSK) यांच्यात खेळवण्यात येणार आहे. या सामन्यात चेन्नईचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीला (Mahendra Singh Dhoni) मोठा रेकॉर्ड करुन मानाच्या पंक्तीत स्थान मिळवण्याची संधी आहे. धोनीला हा विक्रम करण्यासाठी फक्त नि फक्त अवघ्या 65 धावांची गरज आहे. (ipl 2022 1st match csk vs kkr chennai super kings batsman mahendra singh dhoni have need to 65 runs for complete 7 thousnad t 20 runs)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नक्की रेकॉर्ड काय? 


धोनीला टी 20 क्रिकेटमध्ये 7 हजार धावांचा टप्पा गाठण्याची संधी आहे. धोनीला या 7 हजार धावा पूर्ण करण्यासाठी 65 धावा हव्या आहेत. आतापर्यंत एकूण 5 भारतीय फलंदाजांनी टी 20 मध्ये 7 हजारांपेक्षा अधिक धावा केल्या आहेत. यामध्ये विराट कोहली, रोहित शर्मा, शिखर धवन,  सुरेश रैना आणि रॉबिन उथप्पा यांचा समावेश आहे.  


धोनीने आतापर्यंत एकूण 347 टी 20 सामन्यातील 306 डावांमध्ये 38.31 च्या सरासरीने 6 हजार 935 धावा केल्या आहेत. यामध्ये धोनीने 27 अर्धशतकं आणि 1 शतक ठोकलंय.