IPL 2022 : RCB-RR च्या मॅचवर सट्टा लावताना रंगेहाथ पकडले, एवढी कॅश जप्त
पोलिसांच्या विशेष पथकाला सट्टेबाजी सुरु असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचला आणि छापा टाकला.
मुंबई : आयपीएलच्या 15 व्या मोसमाचा (IPL 2022) थरार सुरूच आहे. या दरम्यान बुकीही सक्रिय झाले आहेत. हैदराबादमध्ये पोलिसांनी अशाच एका सट्टेबाजी करणाऱ्या टोळीवर कारवाई केली आहे. पोलिसांनी कारवाई करत 7 जणांना अटक केली आहे. पोलिसांनी या 7 जणांकडून 12 लाखांची रोकड जप्त केली आहे. (ipl 2022 betting on rcb vs rr match police arrested cash worth lakhs recovered)
मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांच्या विशेष पथकाला सट्टेबाजी सुरु असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचला आणि छापा टाकला.
पोलिसांनी छापा टाकला तेव्हा 11 लाख 80 हजार रुपये हस्तगत केले. तसेच बँक खात्यात असलेली 31 लाखांपेक्षा अधिक रक्कमही जप्त केली. अटक करण्यात आलेले सात जण हे मंगळवारी रात्री राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यातील सामन्यावर सट्टा खेळत होते.
पोलिसांनी या 7 जणांपैकी टी नागराजूला केली आहे. नागराजू हा बुकी आहे आणि मॅचशी संबंधित बेटिंग करतो. आयपीएलच्या प्रत्येक हंगामात हा नागराजू आपल्या सहकाऱ्यांसोबत सक्रिय होतो. या संपूर्ण रॅकेटचा मुख्य सूत्रधार साईराम वर्मा होता. या साईरामच्या नेतृत्वात हा सर्व गैरकारभार सुरु होता.
असं चालायंच संपूर्ण रॅकेट
हे संपूर्ण रॅकेट कसं काम करायचं, याची माहिती मिळाली आहे. नागराजू साईराम वर्माकडून सट्ट्याची सर्व रक्कम घ्यायचा. सामन्यानंतर विजेत्यांना रक्कम वाटायचा. हे पैसे वेगवेगळ्या पद्धतीने गोळा केले जायचे. त्यानंतर पैशांचं वाटप केलं जायचं. नागराजूला 2016 मध्येही अशाच एका प्रकरणात अटक करण्यात आली होती.