मुंबई : इंडियन प्रीमियर लीग 2022 सुरू होण्यापूर्वी गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्जला मोठा धक्का बसू शकतो. संघातील स्टार वेगवान गोलंदाज दीपक चहर सुरुवातीच्या सामन्यातून बाहेर होऊ शकतो. आयपीएल 2022 स्पर्धा 26 मार्चपासून सुरू होत आहे तर अंतिम सामना 29 मे रोजी होणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ESPNcricinfo च्या वृत्तानुसार, भारत विरुद्ध वेस्ट इंडिज टी20 (Ind vs WI T20I) मालिकेदरम्यान दुखापत झालेल्या चहरला बरे होण्यासाठी आणखी काही आठवडे लागू शकतात. दीपक चहरच्या दुखापतीवर CSK कडून कोणतीही अधिकृत माहिती आलेली नाही. आयपीएल 2022 पूर्वी सूरतमध्ये त्यांनी आपला कॅम्प लावला आहे.


IPL 2022 मध्ये चहर हा दुसरा सर्वात महाग विकला जाणारा कॅप्ड खेळाडू होता. सीएसकेने 14 कोटींची बोली लावून चहरला आपल्या संघात घेतलं. दिल्ली कॅपिटल्स आणि सनरायझर्सचा संघ चहरला विकत घेण्यासाठी लिलावात मैदानात उतरला होता, पण CSK ने त्याला सर्वाधिक बोली लावून विकत घेतले.



CSK संघ हा यंदाची विजेतेपदाचा प्रबळ दावेदार मानला जात आहे. धोनीच्या नेतृत्वात पुन्हा एकदा विजय मिळवण्यासाठी संघ सज्ज आहे. धोनीला पुन्हा एकदा मैदानात पाहण्यासाठी त्याचे चाहते उत्सूक आहेत.


सीएसके संघात यंदा अनेक नवे खेळाडू दिसणार आहेत. जुन्या आणि नव्या खेळाडूंचं मिश्रण असलेला हा संघ यंदा कशी कामगिरी करतो हे पाहावं लागणार आहे. धोनी कशाप्रकारे खेळाडूंचा उपयोग करुन घेतो. हे देखील यंदा आयपीएल सीजनमध्ये पाहायला मिळणार आहे.