मुंबई : उद्यापासून आयपीएलला सुरुवात होणार आहे. चेन्नई सुपर किंग्ज विरूद्ध कोलकाता नाईड रायडर्स यांच्यात पहिला सामना रंगणार आहे. दरम्यान रविवारी पंजाब किंग्जचा सामना रंगणार आहे. मात्र सामन्यापूर्वी पंजाबच्या टीमला मोठा धक्का बसला आहे. टीममधील महत्त्वाचा खेळाडू रॉयल चॅलेंजर बंगळूरू विरोधातील सामन्यात खेळू शकणार नाहीये.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जगातील धोकादायक गोलंदाजांपैकी एक कगिसो रबाडा पंजाब किंग्सच्या पहिल्या सामना खेळू शकणार नाहीये. मुख्य म्हणजे रबाडा टीमसोबत असूनही हा सामना खेळणार नाहीये. रबाडा क्वारंटाईन असल्याने आरसीबीविरूद्धच्या सामन्यात खेळणार नाहीये. त्यामुळे ही गोष्ट पंजाब किंग्ससाठी मोठ्या धक्क्यपेक्षा कमी नाहीये.


रबाडाच्या चार ओव्हर खेळणं सोपं नाहीये. गेल्या सिझनमध्ये दिल्ली कॅपिटल्सने प्लेऑफपर्यंत मजल गाठली होती. यामध्ये कागिसो रबाडाची मोठी भूमिका होती. त्याने आयपीएलच्या 50 सामन्यांमध्ये एकूण 76 विकेट घेतल्यात. 


पंजाब किंग्जला अजून एकदाही आयपीएलचे विजेतेपद पटकावता आलेलं नाही. दरम्यान यावेळी टीमच्या कर्णधारपदाची धुरा मयांक अग्रवालकडे सोपवण्यात आली आहे. त्यामुळे यंदा टीममध्ये मोठे बदल होणार असून विजेतेपद मिळवणार का याकडे लक्ष लागून राहिलं आहे.