IPL 2022 : RCB ची कॅप्टन्सी चेन्नईच्या घातक बॅट्समनकडे
RCB कडून कर्णधारपदाबाबत मोठी घोषणा, पाहा कोणाच्या खांद्यावर कमान
मुंबई : 26 मार्चपासून आयपीएलला सुरुवात होणार आहे. तर अखेर रॉयल चॅलेंजर बंगळूरूला त्यांचा कर्णधार सापडला आहे. फाफ ड्यू प्लेससला कर्णधारपदाची धुरा सांभाळावी लागणार आहे. आरसीबीने यंदाच्या मेगा ऑक्शनमध्ये फाफ ड्यु प्लेसिसला 7 कोटी रूपये मोजत आपल्या ताफ्यात घेतलं होतं. याचसोबत आरसीबी टीमची जर्सी देखील आज लाँच केली आहे.
आरसीबी टीमच्या कर्णधारपदासाठी फाफ ड्यू प्लेसीससह विराट कोहली आणि ग्लेन मॅक्सवेल यांची नाव चर्चेत होती. अखेरी फाफ ड्यू प्लेसीसच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं. यापूर्वी विराट कोहलीने आरसीबीचं कर्णधारपदं सांभाळलं होतं. मात्र गेल्या वर्षी त्याने या पदाचा राजीनामा दिला आहे.
ग्लेन मॅक्सवेस सध्या लग्नाच्या गडबडीत आहे. त्यामुळे मॅक्सवेल आयपीएलचे पहिले काही सामने खेळणार नाहीये. त्यामुळे अशा परिस्थितीत फाफकडे नेतृत्व सोपवण्यात आलं आहे. शिवाय यापूर्वी विराटला पुन्हा कर्णधार बनवणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या.
कोण कोणं होतं आरसीबीचं कर्णधार विराट कोहली- एकूण मॅच 140, विजय 64, पराभव 69 अनिल कुंबळे- एकूण मॅच 26, विजय 15, पराभव 11 डॅनियल विटोरी- एकूण मॅच 22, विजय 12, पराभव 10 राहुल द्रविड- एकूण मॅच 14, विजय 4, पराभव 10 केविन पिटरसन- एकूण मॅच 6, विजय 2, पराभव 4 शेन वॉटसन- एकूण मॅच 3, विजय 1, पराभव 2