अहमदाबाद :  टीम इंडियाचा (Team India) स्टार ऑलराउंडर हार्दिक पंड्याने (Hardik Pandya) आपल्या नेतृत्वात पदार्पणातील मोसमात गुजरातला (Gujrat Titans) आयपीएल चॅम्पियन केलं. रविवारी 29 मे ला झालेल्या सामन्यात राजस्थानवर 7 विकेट्सने विजय मिळवत विजेतेपदावर नाव कोरलं. गुजरातला चॅम्पियन केल्यानंतर हार्दिकने मोठं विधान केलंय. हार्दिकने आता टीम इंडियाला वर्ल्ड कप जिंकून द्यायचाय, असं म्हणत आपली इच्छा व्यक्त केली. (ipl 2022 champion gujrat titans captain hardik pandya on team india world cup know what he say)


हार्दिक नक्की काय म्हणाला?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 "नक्कीच,  काहीही झालं तरी टीम इंडियासाठी वर्ल्ड कप जिंकायचा आहे. मी माझी सर्व ताकद पणाला लावेन.  मी नेहमीच संघाला प्राधान्य दिलंय. माझ्यासाठी लक्ष्य सोपं होईल. टीम इंडियासाठी खेळणं हे स्वप्न पूर्ण होण्यासारखं आहे. तुम्ही किती सामने खेळलात हे महत्त्वाचं नाही", असं हार्दिक म्हणाला. 


"टीम इंडियाचं प्रतिनिधित्व करणं हे माझ्यासाठी अभिमानास्पद बाब आहे. मला जे प्रेम आणि पाठिंबा मिळाला आहे, ते टीम इंडियाचं प्रतिनिधित्व केल्यानेच मिळालंय. लॉन्ग टर्म किंवा शॉर्ट टर्म, मला कोणत्याही प्रकारे टीम इंडियासाठी वर्ल्ड कप जिंकायचाय", असं हार्दिकने नमूद केलं.  


दरम्यान टीम इंडिया आयपीएलच्या 15 व्या मोसमानंतर दक्षिण आफ्रिका विरुद्ध 5 सामन्यांची टी 20 मालिका खेळवण्यात येणार आहे. या मालिकेतून हार्दिकंच टीम इंडियात पुनरागमन झालंय. त्यामुळे आयपीएलमध्ये धमाका करणारा हार्दिक टी 20 मालिकेत कशी कामगिरी करतो, याकडे क्रीडा चाहत्याचं लक्ष असणार आहे. 


टी20 सीरीजसाठी दक्षिण आफ्रिका टीम : टेम्बा बावुमा (कॅप्टन), क्वींटन डी कॉक, रीजा हेंड्रिक्स, हेनरिक क्लासेन, केशव महाराज, एडेन मार्कराम, डेविड मिलर, लुंगी एन्गिडी, एनरिक नोर्टजे, वेन पार्नेल, ड्वेन प्रिटोरियस, कगिसो रबाडा, तबरेज शम्सी, ट्रिस्टन स्टब्स, रस्सी वॅन डेर डूसन आणि मार्को जेन्सन.


टीम इंडिया : केएल राहुल (कॅप्टन), ऋतुराज गायकवाड, इशान किशन, दीपक हुडा, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत (विकेटकीपर), दिनेश कार्तिक (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, व्यंकटेश अय्यर, वाय चहल, कुलदीप यादव, अक्षर पटेल, आर बिश्नोई, भुवनेश्वर, हर्षल पटेल, आवेश खान, अर्शदीप सिंग आणि उमरान मलिक.