मुंबई : चेन्नई विरुद्ध कोलकाता सामन्याने आयपीएलची सुरुवात होणार आहे. 26 मार्चपासून आयपीएलच्या सामन्यांना सुरुवात होणार आहे. दीपक चाहर पाठोपाठ मोईन अली प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर झाल्यानं चेन्नईचं टेन्शन वाढलं होतं. मोईन अलीला भारतात येण्यासाठी व्हिसा मिळत नव्हता. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

धोनी आणि चेन्नईच्या टीमसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे. अखेर मोईन अलीला व्हिजा मिळाला आहे. लवकरच तो मैदानात खेळताना दिसणार आहे. मोईन अलीच्या व्हिजाचं काम पूर्ण झालं असून तो भारतात येणार आहे. बुधवारी तो मुंबईत पोहोचेल अशी माहिती मिळाली आहे. 


भारताता आल्यानंतर इंग्लिश ऑलराऊंडरला 3 दिवस आयसोलेशनमध्ये राहावं लागणार आहे. त्यामुळे मोईन अली पहिला सामना खेळणार नाही हे निश्चित आहे. पुढचे सामने खेळण्यासाठी मोईन अली उपलब्ध असेल. त्यामुळे चेन्नई संघाला पहिला सामना अली शिवाय खेळावा लागणार आहे. 



मोईनने 28 फेब्रुवारी रोजी व्हिसासाठी अप्लाय केला होतं. 20 दिवसांहून अधिक वेळ होऊन देखील अलीला व्हिसा मिळाला नाही. त्याला व्हिसा मिळाल्यानंतर तो लगेचच भारताकडे रवाना झाला आहे.