CSK ला पुन्हा एकदा चॅम्पियन बनवणार 5 पांडव
मुंबई संघाचा रेकॉर्ड तोडून चेन्नईची नजर पुन्हा एकदा ट्रॉफीवर आहे. ही ट्रॉफी जिंकण्यासाठी चेन्नई संघातील 5 पांडव मदत करणार आहेत. हे पाच पांडव कोण जे चेन्नईला ट्रॉफीपर्यंत पोहोचवण्याचा मार्ग सुकर करतील हे जाणून घेऊया.
मुंबई : आयपीएलच्या 15 व्या हंगामाला लवकरच सुरुवात होणार आहे. ऑक्शन पूर्ण झालं असून आता सर्वजण IPL 2022 कधी सुरू होणार याची प्रतीक्षा सर्वांना आहे. एकूण 70 सामने खेळवले जाणार आहेत. गेल्या वर्षीची ट्रॉफी चेन्नईने जिंकली होती. आता पुन्हा एकदा यंदा चेन्नई ट्रॉफी जिंकण्याचा विक्रम करण्याच्या तयारीत आहे.
मुंबई संघाचा रेकॉर्ड तोडून चेन्नईची नजर पुन्हा एकदा ट्रॉफीवर आहे. ही ट्रॉफी जिंकण्यासाठी चेन्नई संघातील 5 पांडव मदत करणार आहेत. हे पाच पांडव कोण जे चेन्नईला ट्रॉफीपर्यंत पोहोचवण्याचा मार्ग सुकर करतील हे जाणून घेऊया.
1. महेंद्र सिंह धोनी
महेंद्रसिंह धोनी चेन्नई संघाचा कर्णधार आहे. धोनीच्या नेतृत्वामध्ये आतापर्यंत संघाला 4 वेळा ट्रॉफी जिंकण्याचा मान मिळाला आहे. धोनीकडे अनुभव आणि योग्य निरीक्षण करून उत्तम नियोजन करण्याची क्षमता असल्याने त्याचा हा अनुभव संघाच्या कामी येतो. धोनीचे निर्णय शक्यतो चुकत नाहीत. त्यामुळे अचून नियोजन आणि नेतृत्व असे दोन्ही मिलाप असल्याने त्याचा फायदा संघाला होतो.
2. रवींद्र जडेजा
पराभूत होत असलेल्या मॅचचा रुप बदलण्याची ताकद जड्डूकडे आहे. त्यामुळे रवींद्र जडेजाला गेमचेंजर असंही म्हटलं जातं. गेल्यावर्षीच्या हंगामात जडेजानं अखेरच्या काही ओव्हर्समध्ये कमालीची कामगिरी करून अख्खी मॅच फिरवली होती. ऑलराऊंडर जडेजा हा संघासाठी गेमचेंजर ठरू शकतो.
3. ऋतुराज गायकवाड
2021 च्या आयपीएलमध्ये ऋतुराज गायकवाडने 14 सामने खेळून 636 धावा केल्या आहेत. 2021 च्या हंगामात त्याने चांगलं प्रदर्शन केलं होतं. सर्वात जास्त धावा करणारा खेळाडू देखील ठरला होता. त्यामुळे त्याच्या धडाकेबाज फलंदाजीचा फायदा CSK टीमला होणार आहे.
4. ड्वेन ब्रावो
ऑलराऊंडर ड्वेन ब्रावो आपलं वेगळंच स्थान CSK मध्ये निर्माण केलं आहे. डेथ ओव्हरमध्ये आपल्या अनोख्या गोलंदाजीनं तो सर्वांची मनं जिंकतो. सर्वात जास्त विकेट घेणारा ड्वेन ब्रावो ठरला आहे.
5. दीपक चाहर
दीपक चाहरचं CSK संघात विशेष स्थान आहे. चाहरने IPL मध्ये 69 सामने खेळून 59 विकेट्स घेतल्या आहेत. यंदाच्या आयपीएलमध्ये पुन्हा एकदा त्याच्या गोलंदाजीचा जलवा पाहायला मिळू शकतो.