मुंबई : आयपीएलच्या 15 व्या मोसमाला (IPL 2022) 26 मार्चपासून सुरुवात होतेय. या मोसमाच्या सुरुवातीआधी चेन्नईकडून (CSK) खेळणाऱ्या स्टार बॉलरला दुखापत झाली. त्यामुळे चेन्नई आणि कॅप्टन महेंद्रसिंह धोनीच्या (Mahendra Singh Dhoni) डोकेदुखीत वाढ झाली. मात्र आता चेन्नईसाठी काहीशी दिलासादायक बातमी समोर येत आहे. चेन्नईचा वेगवान बॉलर कमबॅकसाठी सज्ज असल्याचं समजतंय. त्यामुळे धोनीचं टेन्शन काही प्रमाणात कमी झालंय. (ipl 2022 chennai super kings star bowler deepak chahar may be comeback in mid april)  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दीपक चहरच्या (Deepak Chahar) दुखापतीबाबत मोठी माहिती समोर आली आहे. दीपक आयपीएलमध्ये खेळण्यासाठी दुखापतीवर (Deepak Chahar Injurey) शस्त्रक्रिया करणार नसल्याचं वृत्त टाईम्स ऑफ इंडियाने दिलं आहे. त्यामुळे दीपक 15 व्या मोसमाच्या काही दिवसांनी कमबॅक करु शकतो.


दीपक सध्या बंगळुरुतील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत (National Cricket Acedmy) दुखापतीवर मेहनत घेतोय. दीपकला एकूण 8 आठवडे एनसीएमध्ये उपचार घ्यायचे आहेत.


चेन्नईची टीम सध्या सूरतमध्ये (Chennai Squad In Surat)  जोरदार सराव करतेय. दीपकने लवकरात लवकर चेन्नईचा ट्रेनिंग कॅम्प जॉईन करावं, अशी चेन्नई टीम मॅनेजमेंटची अपेक्षा आहे.


दीपकला वेस्टइंडिज विरुद्धच्या टी 20 मालिकेत दुखापत झाली होती. विंडिज विरुद्धच्या तिसऱ्या टी 20 मध्ये दीपकच्या पायाला गंभीर दुखापत झाली होती. यामुळे दीपकला श्रीलंका विरुद्धच्या टी 20 सीरिजलाही मुकावं लागलं होतं.


आता दीपकला आयपीएलच्या सुरुवातीच्या सामन्यांनाही मुकावं लागू शकतं. मात्र तो आयपीएलच्या मध्यात चेन्नईशी जोडला जाऊ शकतो, अशी अपेक्षा आहे.