मुंबई : भारतात कोरोनाबाबत थोडी दिलासादायक स्थिती असली तरी आयपीएलवर कोरोनाचं सावट कायम आहे. आयपीएलमध्ये पुन्हा कोरोना घुसला आहे. त्यामुळे बीसीसीआय आणि क्रिकेटप्रेमींचं टेन्शन वाढलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आयपीएलमध्ये आतापर्यंत 53 सामने झाले आहेत. यामध्ये दुसऱ्यांदा कोरोनाने एन्ट्री केली आहे. दिल्लीचा एक खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह आल्याची माहिती मिळाली आहे. या खेळाडूचं नाव अजून समोर आलं नाही. 


दिल्ली टीममध्ये दुसऱ्यांदा कोरोना पॉझिटिव्ह खेळाडू आल्याने आता चेन्नई विरुद्ध सामन्यावर संकट आहे. कोरोना पॉझिटिव्ह रिपोर्ट आल्यानंतर टीममधील इतर सहकारी खेळाडूंना आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आलं आहे. 


दिल्ली टीममध्ये याआधी एक खेळाडूला कोरोनाची लागण झाली होती. मात्र त्याचा सामन्यावर कोणताही परिणाम झाला नाही. सपोर्ट स्टाफमधील काही लोक कोरोना पॉझिटिव्ह आले होते. आता पुन्हा एकदा दिल्ली टीमवर कोरोनाचं संकट आहे.