मुंबई :  आयपीएलच्या 15 व्या मोसमाला (IPL 2022) अवघे काही तास शिल्लक असताना महेंद्रसिंह धोनीने (Mahendra Singh Dhoni) मोठा निर्णय घेतला. धोनीने चेन्नई सुपर किंग्संच कर्णधारपद (Dhoni Captaincy) सोडलं. चेन्नई फ्रँचायजीने  ट्विवद्वारे याबाबतची माहिती दिली. धोनीनंतर आता रवींद्र जाडेजा (Ravindra Jadeja) चेन्नईचा कॅप्टन असणार आहे. धोनीने आयपीएलच्या पहिल्या मोसमापासून चेन्नईचं नेतृत्व केलं होतं. धोनीने आपल्या नेतृत्वात एकूण 6 वेळा चेन्नईला चॅम्पियन केलं होतं.  कॅप्टन कूलने चेन्नईला कधी आणि कसं काय काय मिळवून दिलं, हे आपण जाणून घेऊयात. (ipl 2022 csk chennai super kings captain cool mahendra singh dhoni captaincy record stats)
  
धोनीने आयपीएलच्या इतिहासात एकूण 204 सामन्यांमध्ये नेतृत्व केलंय. यामध्ये त्याने आपल्या कॅप्टन्सीत 121 मॅचेसमध्ये विजय मिळवून दिला. धोनीची विजयी टक्केवारी ही 59.60 टक्के इतकी राहिली आहे.   


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

धोनीने आपल्या नेतृत्वात चेन्नईला एकूण 9 वेळा आयपीएलच्या फायनलपर्यंत पोहचवलं. तर त्याच्या कॅप्टन्सनीत चेन्नईने 11 वेळा प्लेऑफपर्यंत धडक मारली होती. 


धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्जने 4 वेळा आयपीएलचे विजेतेपद पटकावलंय. तर धोनीने चेन्नईला 2 वेळा चॅम्पियन्स लीगचं विजेतेपद मिळवून दिलंय.
 
चेन्नईचं कर्णधारपद सोडल्यानंतर धोनी 2007 नंतर पहिल्यांदाच खेळाडू म्हणून खेळताना दिसणार आहे. धोनीने आपल्या कर्णधारपदाच्या कारकिर्दीत टीम इंडियाला टी 20, एकदिवसीय वर्ल्ड कप जिंकून दिलंय. तसंच चॅम्पिनय ट्रॉफीचा चॅम्पियनही केलंय.