IPL 2022 आधी CSK च्या गोटात घातक बॉलरची एन्ट्री, धोनीला 5 व्यांदा ट्राफी जिंकवणार?
आयपीएलच्या या बहुप्रतिक्षित 15 व्या मोसमाला (Ipl 2022) 24 मार्चपासून सुरुवात होत आहे. साखळी फेरीतील एकूण 70 सामने हे महाराष्ट्रातील (Ipl 2022 In Maharashtra) 4 स्टेडियममध्ये होणार आहे.
मुंबई : भारतात कोरोनानंतर पहिल्यांदा आयपीएलचं (IPL 2022) पुनरागमन झालंय. आयपीएलच्या या बहुप्रतिक्षित 15 व्या मोसमाला 24 मार्चपासून सुरुवात होत आहे. साखळी फेरीतील एकूण 70 सामने हे महाराष्ट्रातील (Ipl 2022 In Maharashtra) 4 स्टेडियममध्ये होणार आहे. तसेच यावेळेस 2 संघ नव्याने जोडले गेल्याने ट्रॉफसाठी 10 टीम भिडणार आहेत. यामुळे क्रिकेट चाहत्यांना थरार अनुभवता येणार आहे. (ipl 2022 csk chennai super kings captain ms dhoni deepak chahar may replace by ishant sharma due to injurey)
चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) आयपीएलच्या इतिहासातील यशस्वी टीमपैकी एक आहे. चेन्नईने 4 वेळा ट्रॉफी जिंकली आहे. मात्र या मोसमाच्या आधी सीएसकेचा स्टार बॉलक दीपक चाहर दुखापतीमुळे बाहेर झाला आहे. त्या जागी कॅप्टन धोनी घातक गोलंदाजाला संधी देऊ शकतो.
धोनी चहरच्या जागी इशांत शर्माला चेन्नईत खेळवू शकतो. इशांत 15 व्या मोसमाच्या मेगा ऑक्शनम्ध्ये अनसोल्ड राहिला होता. त्यामुळे दीपक चाहरच्या जागी इशांतला संधी मिळू शकते.
इशांत धोनीच्या नेतृत्वात अनेक सामने खेळला आहे. दोघांमध्ये कमालीचा ताळमेळ आहे. इशांत अनुभवी गोलंदाज आहे. त्याने टीम इंडियाला विशेषत: परदेशात अनेक सामने जिंकून दिले आहेत. यामुळे इशांत चहरच्या जागेचा प्रबळ दावेदार समजला जात आहे.
इशांतची आयपीएल कारकिर्द
इशांतने आयपीएलमध्ये 93 सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने 72 विकेट्स घेतल्या आहेत. इशांतची 12 धावा देऊन 5 विकेट्स ही सर्वोत्तम कामगिरी आहे. इशांतने आयपीएलमध्ये आतापर्यंत कोलकाता, डेक्कन चार्जस, सनरायजर्स हैदराबाद, पुणे, पंजाब आणि दिल्ली कॅपिट्ल्स या टीमचं प्रतिनिधित्व केलं आहे.
दीपक चाहर बाहेर
सीएसकेने दीपक चाहरसाठी 14 कोटी मोजून त्याला आपल्या ताफ्यात घेतलं. मात्र त्याल वेस्ट इंडिज विरुद्धच्या सामन्यात दुखापत झाली. त्यामुळे दीपकला आयपीएलच्या पहिल्या ट्प्प्याला मुकावं लागलं आहे.
दीपकने 14 व्या मोसमात चेन्नईसाठी निर्णायक कामगिरी केली होती. चेन्नईला ट्रॉफी जिंकून देण्यात दीपकचं योगदान होतं. मात्र या पहिल्या टप्प्यात नसल्याने चेन्नईला दीपकची उणीव भासणार आहे.