IPL 2022, CSK | आयपीएलच्या 15 व्या मोसमाआधी Mahendra Singh Dhoni ने चेन्नईचं कर्णधारपद सोडलं
चेन्नई सुपर किंग्सचा (Chennai Super Kings) कर्णधार महेंद्रसिंह धोनीने (Mahendra Singh Dhoni) मोठा निर्णय घेतला आहे.
मुंबई : आयपीएलच्या 15 व्या मोसमाला (IPL 2022) 26 मार्चपासून सुरुवात होत आहे. या हंगामासाठी अवघे काही तास शिल्लक असताना चेन्नई सुपर किंग्सचा (Chennai Super Kings) कर्णधार महेंद्रसिंह धोनीने (Mahendra Singh Dhoni) मोठा निर्णय घेतला आहे. धोनीने चेन्नईचं नेतृत्व सोडण्याचा निर्णय घेतला आहे. चेन्नईने ट्विटद्वारे याबाबतची माहिती दिली आहे. धोनीने तडकाफडकी घेतलेल्या या निर्णयामुळे धोनीच्या चाहत्यांमध्ये नाराजीचं वातावरण आहे. (ipl 2022 csk chennai super kings mahendra singh dhoni steps down captaincy and give hand over to ravindra jadeja)
आता चेन्नईची कमान कोणाकडे?
धोनीने कर्णधारपदाचा राजीनामा दिल्यानंतर ऑलराऊंडर खेळाडू रवींद्र जाडेजाकडे संघाची धुरा सोपवण्यात आली आहे. चेन्नईने ट्विट करत याबाबतची माहिती दिली आहे.
धोनीची कर्णधार म्हणून कामगिरी
धोनीने आयपीएलमध्ये सर्वाधिक काळ चेन्नईचं नेतृत्व केलं. तर काही मोसमासाठी पुण्याची कॅप्टन्सी केली. धोनीने आयपीएलच्या इतिहासात एकूण 204 सामन्यांमध्ये नेतृत्व केलंय. यामध्ये त्याने आपल्या कॅप्टन्सीत 121 मॅचेसमध्ये विजय मिळवून दिला. धोनीची विजयी टक्केवारी ही 59.60 टक्के इतकी राहिली आहे.
आयपीएलच्या इतिहासातील यशस्वी कर्णधार
धोनी आयपीएलच्या इतिहासातील रोहित शर्मानंतर दुसरा यशस्वी कर्णधार आहे. धोनीने चेन्नईला एकूण 4 वेळा आयपीएल ट्रॉफी मिळवून दिली आहे. धोनीने चेन्नईला 2010, 2011, 2018 आणि 2021 मध्ये आयपीएलचं विजेतेपद मिळवून दिलं होतं.
अशी आहे चेन्नईची टीम (CSK Team 2022 Players List) :
रवींद्र जडेजा (कॅप्टन), महेंद्र सिंह धोनी, मोईन अली, ऋतुराज गायकवाड, ड्वेन ब्रावो, अंबाती रायडू, केएम आसिफ, तुषार देशपांडे, दीपक चाहर, शिवम दुबे, महेश दीक्षाना, राजवर्धन हंगरकेकर, सिमरजीत सिंह, डेवोन कॉनवे, ड्वेन प्रिटोरियस, मिशेल सेंटनर, एडम मिल्ने, सुभ्रांशु सेनापति, मुकेश चौधरी आणि प्रशांत सोलंकी.