मुंबई : आयपीएलच्या 15 व्या मोसमात (IPL 2022) चेन्नई सुपर किंग्सची (Chennai Super Kings) आतापर्यंत निराशाजनक कामगिरी राहिली. याच चेन्नईला आता मोठा झटका लागू शकतो. चेन्नईचा स्टार ऑलराउंडर रवींद्र जाडेजाला (Ravindra Jadeja) दुखापतीमुळे या मोसमाला मुकावं लागू शकतं. (ipl 2022 csk chennai super kings star allrounder ravindra jadeja may ruled out due to injurey)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जाडेजाला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्धच्या सामन्यात फिल्डिंग करताना शरीराच्या वरच्या भागाला दुखापत झाली होती. या दुखापतीमुळे जाडेजाला दिल्ली विरुद्धच्या सामन्याला मुकावं लागलं होतं. आता टीओआयने दिलेल्या वृत्तानुसार, जाडेजाला या मोसमातून बाहेर पडावं लागू शकतं. 


जाडेजाची निराशाजनक कामगिरी


जाडेजाला या मोसमाच्या सुरुवातीला चेन्नईच्या कॅप्टन्सीची जबाबदारी मिळाली. मात्र जाडेजाला धोनीच्या कॅप्ट्न्सीचा वारसा यशस्वीपणे पुढे नेता आला नाही. चेन्नईने या मोसमात जाडेजाच्या नेतृत्वात 8 सामने खेळले. या 8 पैकी फक्त 2 सामन्यात चेन्नईला विजय मिळवता आला. तर 6 वेळा प्रतिस्पर्धी संघाकडून पराभव स्वीकारावा लागला.


कॅप्टन्सीमध्ये अपयशी ठरल्यानंतर जाडेजाने कर्णधारपदाचा राजीनामा दिला. यानंतर आता पुन्हा धोनीकडे जबाबदारी आल्यानंतर त्याने चेन्नईला काही सामन्यात विजय मिळवून दिला.


चेन्नईचं या मोसमातील आव्हान संपल्यात जमा आहेत. मात्र चेन्नईच्या उर्वरित सामन्यातील कामगिरीवर इतर संघांचं भवितव्य ठरणार आहे. त्यामुळे चेन्नई उर्वरित सामन्यात कशी कामगिरी करणार, याकडे चाहत्यांचं लक्ष असणार आहे.