मुंबई : पंजाब किंग्सने (Punjab Kings) चेन्नई सुपर किंग्सला (Chennai Super Kings)विजयसााठी 181 धावांचे आव्हान दिले आहे. पंजाबने निर्धारित 20 ओव्हरमध्ये 8 विकेट्स गमावून 180 धावा केल्या. पंजाबकडून लियाम लिविंगस्टोनने (Liam Livingstone) सर्वाधिक  60 धावांची तुफानी खेळी केली. या 32 बॉलच्या खेळीत त्याने 5 फोर आणि 5 सिक्स खेचले.  त्याशिवाय शिखर धवनने 33 आणि जितेश शर्माने 26 रन्सचं योगदान दिलं. (ipl 2022 csk vs pbks punjab kings set 181 runs target for winning to chennai super kings at brabourne stadium mumbai)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चेन्नईकडून ख्रिस जॉर्डन आणि मोईन अलीने प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या. तर मुकेश चौधरी, ड्वेन ब्राव्हो आणि कॅप्टन रवींद्र जाडेजाने प्रत्येकी 1 फलंदाजाला मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. 


चेन्नई प्लेइंग इलेव्हन : रवींद्र जडेजा (कर्णधार), ऋतुराज गायकवाड, रॉबिन उथप्पा, मोईन अली, अंबाती रायुडू, शिवम दुबे, महेंद्रसिंह धोनी (विकेटकीपर), ड्वेयन प्रिटोरियस, ड्वेन ब्राव्हो, ख्रिस जॉर्डन आणि मुकेश चौधरी.


पंजाब प्लेइंग इलेव्हन : मयंक अग्रवाल (कॅप्टन), शिखर धवन, भानुका राजपक्षे (विकेटकीपर), लियाम लिविंगस्टन, जितेश शर्मा, शाहरुख खान,  वैभव अरोरा, ओडियन स्मिथ, कगिसो रबाडा, अर्शदीप सिंह आणि राहुल चाहर.