सावधान! कोरोनाचा धोका वाढला| सामन्याआधी `टीम` पॉझिटिव्ह
आयपीएलचा 15 व्या मोसमात (Corona In IPL 2022) कोरोनाचा शिरकाव झाला. या शिरकावानंतर आयपीएल कोरोनाच्या विळख्यात सापडला आहे.
मुंबई : आयपीएलचा 15 व्या मोसमात (Corona In IPL 2022) कोरोनाचा शिरकाव झाला. या शिरकावानंतर आयपीएल कोरोनाच्या विळख्यात सापडला आहे. आयपीएलच्या 15 व्या मोसमातील 32 वा सामना हा दिल्ली विरुद्ध पंजाब (Delhi Capitals VS Punjab Kings) यांच्यात आयोजित करण्यात आला आहे. मात्र या सामन्याच्या काही मिनिटांपूर्वी दिल्ली कॅपिट्ल्सच्या आणखी एका खेळाडूला कोरोना झालाय. त्यामुळे दिल्ली विरुद्ध पंजाब हा सामना होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. (ipl 2022 dc delhi capitals another one player tested covid positive before dc vs pbks match)
दिल्लीचा खेळाडू टीम सायफर्ट (Tim Seifert) याल कोरोना झालाय. टीम दिल्लीचा दुसरा पॉझटिव्ह खेळाडू आहे. याआधी शॉन मार्शला कोरोना झाला होता. तर या व्यतिरिक्त सपोर्ट स्टाफमधील इतर सदस्यांनाही कोरोना झाला होता.
कोरोनाच्या वाढत्या प्रकोपामुळे बीसीसीआयने दिल्ली विरुद्ध पंजाब सामन्याचं ठिकाणही बदललं. खेळाडूंना दूरचा प्रवास करावा लागू नये, या उद्देशाने आजच्या सामन्याचं आयोजन हे पुण्याऐवजी मुंबईत करण्यात आलंय. मात्र आता टीमला कोरोना झाल्यानंतर बीसीसआय काय निर्णय घेणार, याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.
दिल्लीत आतापर्यंत कोणाला कोरोना?
1. पॅट्रिक फरहार्ट (फिजिओ)
2. चेतन कुमार (मसाज थेरपिस्ट)
३. मिचेल मार्श (खेळाडू)
4. अभिजित साळवी (डॉक्टर)
5. आकाश माने (सोशल मीडिया टीम)
6. टीम सायफर्ट (खेळाडू)