मुंबई : मुंबई इंडियन्स (Mumbai Indians), आयपीएलच्या इतिहासातील आतापर्यंतची (Most Successful Team In Ipl) सर्वात यशस्वी टीम. मुंबईने 2013 पासून ते 2021 पर्यंत रोहित शर्माच्या नेतृत्वात एकूण 5 वेळा आयपीएल ट्रॉफी जिंकण्याची कामगिरी केली आहे. मुंबईकडे काय नाहीये, अशातला भाग नाही. बॅट्समन, मिडल ऑर्डर, ऑलराऊंडर, फिल्डर, बॉलर जे हवं ते सर्व काही आहे. मात्र मुंबईला 2013 पासून एक कामगिरी काय अजून जमलेली नाही. (ipl 2022 dc vs mi mumbai indians lost their his 1st match in each season after to 2013 in rohit sharma captaincy) 
 
मुंबईचा यंदाच्या 15 व्या मोसमातील पहिला सामना हा दिल्ली विरुद्ध पार पडला. या सामन्यात दिल्लीने मुंबईचा पराभव केला. या पराभवासह मुंबईने 2013 पासूनची पराभवाची मालिका कायम ठेवली. त्याचं असंय की मुंबईला आयपीएलमध्ये 2013 पासून ते आतापर्यंत मोसमातील आपला पहिला सामना काही जिंकता आलेला नाही. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हो हे अगदी खरंय, मुंबईला 2013 पासून प्रत्येक मोसमातील आपल्या पहिल्या सामन्यात विजय मिळवता आलेला नाही. 


मुंबईने आयपीएलमधील आपला पहिला सामना हा अखेरीस 2012 मध्ये जिंकला होता. तेव्हा मुंबईने चेन्नईवर 8 विकेट्सने विजय मिळवला होता. विशेष बाब अशी की मुंबईने 2013 पासून आयपीएल ट्रॉफी जिंकण्याची सुरुवात केली. यासह पहिला सामन्यात पराभूत होण्याची परंपराही कायम झाली.  त्यामुळे आता हा डाग पुसून काढण्यासाठी पुढील 16 व्या हंगामाची वाट पाहावी लागणार आहे.