मुंबई :  मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians) आक्रमक आणि युवा सलामीवीर बॅट्समन ईशान किशनने (Ishan Kishan) आयपीएलच्या 15 व्या मोसमातील शानदार सुरुवात केली आहे. ईशानने दिल्ली कॅपिट्ल्स (Delhi Capitals) विरुद्धच्या सामन्यात शानदार अर्धशतक ठोकलयं. (ipl 2022 dc vs mi mumbai indians opener batsman ishan kishan scored fifty against delhi capitals)   
 
विशेष म्हणजे ईशानने सिक्स ठोकत अर्धशतकं पूर्ण केलं.ईशानने 34 चेंडूत हे अर्धशतक ठोकलं . इशानच्या आयपीएलच्या कारकिर्दीतील हे 10 वं अर्धशतक ठरलं. ईशानने या अर्धशतकी खेळीत 6 फोर आणि 2 खणखणीत सिक्स ठोकले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबई प्लेइंग इलेव्हन : रोहित शर्मा (कॅप्टन), ईशान किशन (विकेटकीपर), तिलक वर्मा, अनमोलप्रीत सिंह, किरॉन पोलार्ड, टीम डेव्हिड, डॅनियल सॅम्स, मुरुगन अश्विन, जसप्रीत बुमराह, टायमल मिल्स आणि बासिल थम्पी. 


दिल्ली प्लेइंग इलेव्हन : ऋषभ पंत (कॅप्टन/विकेटकीपर), पृथ्वी शॉ, टीम सायफर्ट, मंदीप सिंह, रोवमैन पावेल, ललित यादव, अक्षर पटेल, शार्दुल ठाकुर, खलील अहमद, कुलदीप यादव आणि कमलेश नागरकोटी.