मुंबई : IPL 2022 मध्ये 2 नव्या संघाची एन्ट्री होणार आहे. त्यामुळे पुढील वर्षी एकूण 10 संघ खेळताना दिसणार आहे. अहमदाबाद आणि लखनौ असे हे 2 नवे संघ असण्याची शक्यता आहे. एका वृत्तवाहिनीच्या बातमीनुसार, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) 2022 इंडियन प्रीमियर लीग (IPL) टप्प्यात आणखी दोन संघ जोडण्याची योजना आखली आहे. अहमदाबाद, लखनौ आणि पुणे यापैकी 2 संघ असण्याची शक्यता आहे. दोन नवीन आयपीएल फ्रँचायझींची घोषणा 25 ऑक्टोबर रोजी केली जाईल, ज्यामुळे आयपीएलमध्ये 10 संघांची स्पर्धा होईल.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एनडीटीव्हीनुसार, अदानी ग्रुपने अहमदाबाद येथून संघासाठी बोली लावल्याची माहिती मिळाली आहे. दोन सर्वोच्च बोलीदार दोन नवीन फ्रँचायझीचे मालक असतील. जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट मंडळ बीसीसीआयने बोली लावण्यासाठीची मुदत 20 ऑक्टोबरपर्यंत वाढवली होती.


संबंधित बातमी दीपिका आणि रणवीर IPL मध्ये या शहराच्या संघावर बोली लावण्याची शक्यता


पीटीआयच्या म्हणण्यानुसार, बीसीसीआयला किमान 7,000 ते 10,000 कोटी रुपये मिळण्याची अपेक्षा आहे, जर प्रत्येक संघाची मूळ किंमत 2,000 कोटी रुपये ठेवण्यात आली आहे. भारतीय क्रिकेट बोर्डाने तीन संघांच्या गटाला बोली लावण्याची परवानगी दिली आहे.