मुंबई : आयपीएलमध्ये बुधवारी रोमांचक सामना पाहायला मिळाला. लखनऊ विरुद्ध कोलकाता खूपच अटीतटीचा सामना झाला. कोलकाता टीमला हा सामना 2 धावांसाठी गमवण्याची वेळ आली. लखनऊ टीम प्लेऑफपर्यंत पोहोचली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोलकातासाठी एक कॅच घातक ठरला आणि गेमची बाजीच पलटली. कोलकाता टीमला 2 धावांनी पराभव स्वीकारावा लागला. एका कॅचनं कोलकाताचा सगळा गेमच पलटला. कोलकाता विजयाच्या जवळ होती मात्र सगळा घोळ झाला. 


शेवटच्या ओव्हरमध्ये कोलकाताला 21 धावांची गरज होती. रिंकू सिंहने 4 बॉलमध्ये 4-6-6 आणि 2 धावा केल्या. शेवटच्या दोन बॉलवर कोलकाताला विजयासाठी 3 धावांची गरज होती. 


मार्कस स्टोइनिसच्या बॉलवर रिंकूने लाँग शॉट खेळला. तो बाउंड्रीजवळ जाणार  तेवढ्यात एविन लुइसने कॅच पकडला. एक क्षण वाटलं की त्याच्या हातून कॅच सुटेल पण तसं झालं नाही. कॅच पकडल्याने कोलकाताचं स्वप्न भंग झालं.


लखनऊ विरुद्ध सामन्यात कोलकाताला 2 धावांनी पराभव स्वीकारावा लागला. लखनऊ टीम 2 धावांनी सामना जिंकून प्लेऑफपर्यंत पोहोचली आहे.