मुंबई : IPL 2022 च्या फायनलचा सामना खूपच रोमहर्षक होता. पदार्पणाच्या सिझनमध्ये गुजरात टायटन्सने केवळ अंतिम फेरी गाठली नाही तर ही विजेतेपदावर नावंही कोरलं. टायटन्सच्या प्रत्येक खेळाडूसाठी हा सामना खूप खास होता. मात्र या सामन्यानंतर पराभवाचा सामना करावा लागल्याने राजस्थानचे चाहते फारच नाराज झाले आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अंतिम सामन्यासह, 15 व्या सिझनला विजेती टीम मिळाली आहे. दुसरीकडे, राजस्थान रॉयल्सला पराभवाचा सामना झाल्याने त्यांना अनेक टीकांचा सामना करावा लागतोय. यावेळी चाहत्यांनी राजस्थानवर मॅच फिक्स केल्याचाही आरोप लावला.


टॉस जिंकल्यानंतर राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसनने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र त्याचा हा निर्णय टीमच्या बाजूने सिद्ध झाला नाही. उलट या संपूर्ण सामन्यात टायटन्सने एकतर्फी विजयाची नोंद केली. 


सामना गमावल्यावर टॉसनंतर सॅमसनने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतल्याने चाहते चांगलेच संतापलेत. आता आरआरने ही ट्रॉफी गमावल्याने पिंक आर्मीवर फिक्सिंगचा आरोप होतोय. सोशल मीडियावर हा वेगाने ट्रेंड होत असून चाहत्यांनी टीमवर टीका केल्या आहेत. 





यावेळी एका युझरने, राजस्थान विरूद्ध गुजरात टायटन्सचा सामना फिक्स असल्याचं म्हटलं आहे. शिवाय अजून एका युझरने, फिक्सिंग असा हॅशटॅग वापरत राजस्थानने टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय का घेतला, असा सवाल केला आहे. 






ट्विटरवर अजून एका युझरने, टॉस जिंकूनही फलंदाजी घेण्याच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली आहे. गेल्या दोन सामन्यांत प्रथम गोलंदाजी करून सामने जिंकले, तरीही फायनलामध्ये प्रथम फलंदाजी का असं म्हणत राजस्थानवर फिक्सिंग केल्याचा आरोप लावण्यात आलाय.