मुंबई: भारत विरुद्ध न्यूझीलंड पहिल्या कसोटी सामन्याआधी क्रीडा विश्वातून एक मोठी बातमी येत आहे. सर्वांचं लक्ष असणारी IPL 2022 च्या तारखा ठरल्या आहेत. आयपीएल 2022 च्या तारखा निश्चित करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे 2022 मध्ये भारतात आयपीएलचं आयोजन करण्यात येणार आहे. भारतात ही स्पर्धा आयोजित करण्यात येणार असल्याचं एक अहवालात म्हटलं आहे. याबाबत लवकरच अधिकृत घोषणा होऊ शकते. 


कोरोनामुळे भारतात आयोजित करण्यात आलेले IPL 2021 चे सामने 4 मे रोजी स्थगित करण्यात आले. तर सप्टेंबर महिन्यात पुन्हा स्थगित सामने खेळवण्यात आले होते. यंदा CSK संघाने आयपीएलची ट्रॉफी जिंकली आहे. 


पुढच्यावर्षी म्हणजेच 2022 मध्ये 10 संघ आयपीएलमध्ये खेळवण्यात येणार आहेत. अहमदाबाद आणि लखनऊ अशा दोन नव्या संघांचा समावेश असणार आहे. BCCI ने तयार केलेल्या शेड्युलनुसार 2 एप्रिल 2022 रोजी पहिला IPL चा सामना खेळवण्यात येईल. 


10 संघ आणि 74 सामने खेळवण्यात येणार आहेत. तर जून महिन्यात अंतिम सामना खेळवण्यात येणार आहे. IPL 2022 चा पहिला सामना चेन्नईमध्ये खेळवण्यात येणार आहे. 2022 च्या आयपीएलसाठी डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात खेळाडूंचा लिलाव होणार आहे.