IPL 2022 : IPL च्या 15 व्या हंगामाच्या तारखा कधीही BCCI कडून जाहीर केल्या जाऊ शकतात. बीसीसीआयने त्याची संपूर्ण ब्ल्यू प्रिंट तयार केली आहे. यावेळी आयपीएल भारतातच होणार असून मार्चच्या शेवटच्या महिन्यापासून सामने सुरू होऊ शकतात. (IPL 2022 Matches in Mumbai and Pune)


26 मार्चपासून होऊ शकते सुरुवात


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पुढील महिन्यातच आयपीएल सुरू होऊ शकते. मिळालेल्या माहितीनुसार, IPL 2022 चे सामने 26 मार्चपासून सुरू होणार आहे. यापूर्वी 27 मार्चपासून सुरू होणार असल्याचे समोर येत होते. ब्रॉडकास्टर आणि बीसीसीआयमध्ये याबाबत बोलणी सुरू आहेत.


आयपीएलचा लिलाव संपला


T20 लीगच्या या हंगामात 10 संघ मैदानात उतरतील. यासाठी आयपीएल मेगा लिलावाचे आयोजन करण्यात आले होते. नुकत्याच झालेल्या लिलावात 204 खेळाडूंना वेगवेगळ्या संघात स्थान मिळाले. 33 खेळाडूंना कायम ठेवण्यात आले. म्हणजेच चालू हंगामात एकूण 237 खेळाडू मैदानात उतरतील.


प्रसारकांना आयपीएलची स्पर्धा 26 मार्चपासून व्हावी आणि रविवार, 27 मार्च रोजी 2 सामने खेळवायचे आहेत. फ्रँचायझीच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, “शनिवारपासून स्पर्धा सुरू झाल्याने ब्रॉडकास्टरला मदत होईल. यासह पहिल्या 2 दिवसात 3 सामने खेळवले जातील आणि वातावरण निर्मिती होईल. रविवारपासून ही स्पर्धा सुरू होत असल्याने असे करणे शक्य नाही. मात्र, बोर्ड आणि ब्रॉडकास्टरकडून याबाबत कोणतेही अधिकृत निवेदन देण्यात आलेले नाही.


मुंबई आणि पुण्यात IPL सामने


भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने सर्व फ्रँचायझींना 20 फेब्रुवारीपर्यंत वेळापत्रक कळवण्यास सांगितले होते. पण नवीन गोष्टींनंतर अजून काही वेळ लागू शकतो. मंडळाने अद्याप ठिकाण जाहीर केलेले नाही. मुंबई क्रिकेट असोसिएशनने (MCA) वानखेडे, ब्रेबॉर्न, डीवाय पाटील आणि पुण्यातील चार मैदाने ठरवली आहेत.


पण 10 संघांना सरावासाठी मैदान उपलब्ध करून देणे हे मोठे आव्हान आहे. बायो बबल फॉलो केल्याशिवाय आयपीएल शक्य नाही. सर्व निर्बंध असतानाही गेल्या मोसमात कोरोनाचा स्फोट झाला आणि अनेक खेळाडूंना याची लागण झाली होती.