रोहितच्या नेतृत्वात `या` ऑलराउंडरचं टीम इंडियात कमबॅक होणार?
आयपीएलच्या 15 व्या मोसमात (IPL 2022) गुजरात टायटन्स (Gujrat Titans) चांगली कामगिरी करत आहे.
मुंबई : आयपीएलच्या 15 व्या मोसमात (IPL 2022) गुजरात टायटन्स (Gujrat Titans) चांगली कामगिरी करत आहे. गुजरातने 11 पैकी 8 सामने जिंकले आहेत. या संघातील एका खेळाडूने चांगली कामगिरी केली आहे. अशा परिस्थितीत आयपीएलनंतर निवड समिती या खेळाडूला टीम इंडियामध्ये संधी देऊ शकते. (ipl 2022 gt gujrat titans captain hardik pandya may come team india in rohit sharma captaincy)
गुजरात टायटन्सचा कॅप्टन आणि स्टार ऑलराऊंडर हार्दिक पंड्या (Hardik Pandya) शानदार फॉर्ममध्ये आहे. त्याने आपल्या फलंदाजीने सर्वांची मनं जिंकली आहेत. हार्दिकने आतापर्यंत दमदार कामिगिरी केलीय. त्याने आतापर्यंत 10 सामन्यांमध्ये 309 धावा केल्या आहेत. तसेच 4 विकेट्सही घेतल्या आहेत. हार्दिक
टीम इंडियातून बाहेर
हार्दिक पांड्या बऱ्याच दिवसांपासून टीम इंडियातून बाहेर आहे. हार्दिकने अखेरचा सामना 2021 च्या टी 20 वर्ल्ड कपमध्ये खेळला होता. हार्दिकच्या खराब फिटनेस आणि फॉर्ममुळे त्याला टी-20 वर्ल्डकपनंतर टीम इंडियातून वगळण्यात आलं. पण हा खेळाडू आता IPL 2022 मध्ये पूर्ण फिटनेससह परतला आहे. हार्दिक डेथ ओव्हर्समध्ये फिनिशरची भूमिकाही बजावत आहे.
टीम इंडियात संधी?
टीम इंडियाला आयपीएलनंतर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 5 सामन्यांची टी 20 सीरिज खेळायची आहे. त्यानंतर भारतीय संघ वेस्ट इंडिज दौऱ्यावर जाणार आहे. हे पाहता निवड समिती हार्दिकला टीम इंडियात संधी देऊ शकते. हार्दिककडे सामना एकहाती पालटण्याची क्षमता आहे. त्याचबरोबर गोलंदाजीसह योगदान देऊ शकतो. हार्दिक रोहित शर्माच्या आवडत्या खेळाडूंमधील असल्याचं म्हटलं जातं. अशा परिस्थितीत रोहितच्या नेतृत्वाखाली हार्दिकला पुन्हा संधी मिळू शकते.