कोण आहे आयुष बदोनी ज्याने हार्दिक पांड्यालाही सोडलं नाही...
बॉलर्सची धुलाई करणाऱ्या 22 वर्षांच्या आयुष बदोनी बद्दल ही खास गोष्ट तुम्हाला माहीत आहे का?
मुंबई : आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील चौथा सामना दोन नव्या टीममध्ये झाला. गुजरात संघाने 5 विकेट्सने लखनऊ संघाचा पराभव केला. या रोमांचक विजयात राहुल तेवतियाचा वाटा मोठा आहे. राहुल 40 रनवर नाबाद राहिला.
गुजरात विरुद्ध लखनऊ सामन्यात युवा बॅट्समन आयुष बदोनीची तुफान फटकेबाजी सर्वांना पाहायला मिळाली. बदोनीनं 41 बॉलमध्ये 54 धावा केल्या. त्यामध्ये 4 चौकार आणि 3 षटकार ठोकले. त्याच्या तुफान फलंदाजीनं सर्वांना आश्चर्यचकीत केलं.
15 व्या ओव्हरमध्ये 3 बॉलवर आयुषने एक षटकार आणि 2 चौकार ठोकले. दीपक हुड्डाने शेवटच्या बॉलवर चौकार मारला. यामध्ये 19 धावा मिळाल्याने लखनऊ टीम पुन्हा ट्रॅकवर आली खरी पण काही छोट्या चुकांमध्ये त्यांना पराभवाचा सामना करावा लागला.
कोण आहे आयुष बदोनी?
आयुष बदोनीचा जन्म 3 डिसेंबर 1999 मध्ये दिल्लीत झाला. 2018 मध्ये त्याच्या फलंदाजीची खूप चर्चा सुरू झाली. डाव्या हाताचा फलंदाज असलेल्या आयुषने गुजरात विरुद्धच्या सामन्यात आपली कामगिरीनं सर्वांनाच आश्चर्यचकीत केलं.
याआधी त्याने एशिया कपमध्ये श्रीलंकेविरुद्ध अंडर 19 मधून खेळताना त्याने 28 बॉलमध्ये 52 धावा केल्या होत्या. लखनऊने त्याला मेगा ऑक्शनमध्ये 20 लाख रुपये देऊन टीममध्ये घेतलं.