IPL 2022, GT vs LSG 2022 : युवा Ayush Badoniचा पदार्पणात धमाका, ठोकलं खणखणीत अर्धशतक
प्रत्येक खेळाडूचा आपल्या डेब्यूत (Debutant) शानदार कामगिरी करण्याचा मानस असतो. त्याचनुसार 22 वर्षाच्या आयुष बदोनीने (Ayush Badoni) आपल्या आयपीएल कारकिर्दीचा शानदार श्रीगणेशा केला.
मुंबई : आयपीएलच्या 15 व्या (IPL 2022) मोसमातील चौथ्या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्सने (lucknow supergiants) गुजरात टायटन्सला (Gujrat Titans) विजयासाठी 159 धावांचे आव्हान दिले आहे. (ipl 2022 gt vs lsg lucknow super giants debutant ayush badoni scored fifty at wankhede stadium mumbai)
गुजरातने निर्धारित 20 ओव्हरमध्ये 6 विकेट्स गमावून 158 धावा केल्या. लखनऊ आणि गुजरात या दोन्ही टीमचा पदार्पणातील म्हणजेच पहिलाच सामना होता.
आपल्या टीमच्या आणि वैयक्तिक पदार्पणातील सामन्यात लखनऊचा आयुष बदानी (ayush badoni) चमकला. आयुषने 54 रन्सची खेळी करत क्रिकेट विश्वाला आपली नोंद घेण्यास भाग पाडलं.
प्रत्येक खेळाडूचा आपल्या डेब्यूत शानदार कामगिरी करण्याचा मानस असतो. त्याचनुसार 22 वर्षाच्या आयुष बदोनीने आपल्या आयपीएल कारकिर्दीचा शानदार श्रीगणेशा केला.
आयुषने टीमसाठी तारणहाराची भूमिका बजावली. आयुषने टीम अडचणीत असताना 54 चमकदार खेळी केली.
पदार्पणातील सामन्यात प्रत्येक खेळाडूवर चांगली कामगिरी करण्याचा दबाव असतोच. लखनऊची निराशानजक सुरुवात झाली.
कॅप्टन केएल राहुल पहिल्याच बॉलवर आऊट झाला. त्यानंतर गुजरातच्या गोलंदाजांनी लखनऊला ठराविक अंतराने धक्के दिले.
त्यामुळे आयुषवर आणखी दबाव वाढला. मात्र आयुषने न डगमगता परिस्थितीला तोंड देत आपल्या टीमला तारलं. त्याने वैयक्तिक पहिलं अर्धशतक ठोकलं.
इतकच नाही, तर त्याने पाचव्या विकेटसाठी दीपक हुड्डासह 87 धावांची निर्णायक भागीदारी केली. या भागीदारीमुळे अडचणीत असलेल्या लखनऊला गुजरातसमोर 159 धावांचं सन्मानजनक आव्हान ठेवता आलं.
लखनऊकडून दीपक हुडडाने सर्वाधिक 55 धावांची खेळी केली. त्याने या दरम्यान 6 फोर आणि 2 सिक्स ठोकले.
तर आयुषने 41 बॉलमध्ये 4 फोर आणि 3 खणखणीत सिक्ससह 54 रन्स केल्या.
गुजरातचे अकरा शिलेदार : हार्दिक पंड्या (कॅप्टन), शुभमन गिल, मॅथ्यू वेड, डेव्हिड मिलर, विजय शंकर, अभिनव मनोहर, राहुल तेवतिया, राशिद खान, लॉकी फर्ग्यून, वरुण एरॉन आणि मोहम्मद शमी.
लखनऊ प्लेइंग इलेव्हन : केएल राहुल (कॅप्टन), क्विटंन डी कॉक, एविन लुईस, मनीष पांडे, दीपक हुड्डा, क्रृणाल पंड्या, आयुष बडोनी, रवी बिश्नोई, आवेश खान, दुष्मंता चमीरा आणि मोहसिन खान.