IPL 2022: सुरेश रैनाला मोठा धक्का! आधी धोनीनं सोडली साथ आता पांड्याकडूनही दुर्लक्ष
आधी धोनीनं सोडली साथ आता पांड्याकडूनही दुर्लक्ष, पाहा सुरेश रैनासोबत नेमकं काय घडलं
मुंबई : आयपीएल सुरू होण्यासाठी अवघे काही दिवस शिल्लक आहेत. आयपीएल सुरू होण्याआधी सुरेश रैनाला मोठा धक्का बसला आहे. सुरेश रैनाला आयपीएलमध्ये स्थान मिळवताना आधीच अनेक समस्यांचा सामना करावा लागला आहे. त्याच दरम्यान पुन्हा एकदा रैनाला धक्का बसला आहे.
IPL 2022 चे सामने सुरू होण्याआधी गुजरात संघाला मोठा धक्का बसला आहे. जेसन रॉयने संघातून आपलं नाव मागे घेतलं आहे. तो मैदानात खेळताना दिसणार नाही. गुजरातच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार जेसनची जागा अफगानिस्तानचा आक्रमक खेळाडू रहमामुल्लाह गुरबाज घेऊ शकतो.
कोरोनामुळे जास्त वेळ बायोबबलमध्ये राहाव लागणार असल्याने जेसननं आपलं नाव आयपीएलमधून मागे घेतल्याची माहिती मिळाली आहे. गुरबाज हा सर्वोत्तम खेळाडू आहे. त्याने 69 टी 20 सामने खेळून 113 षटकार ठोकले आहेत. मात्र त्याला संघात घेण्यासाठी अजून BCCI चा हिरवा कंदील मिळाला नाही. यासाठी गुजरात फ्रेंचायजी अजून प्रतीक्षा करत आहे.
गुरबाजला संघात घेण्यामागे अजून एक कारण आहे. मॅथ्यू वेड सुरुवातीचे सामने खेळू शकणार नाही. त्यामुळे विकेटकीपरची कमतरता संघाला भासू शकते ही कमी पूर्ण करण्यात गुरबाज मदत करू शकेल असा विश्वास गुजरातला आहे. तो यापूर्वी बांग्लादेश प्रीमियर लीगसाठी खेळला आहे.
सुरेश रैनाला अजूनही अनसोल्ड राहिला आहे. गुजरात संघ सुरेश रैनाला प्राधान्य देण्याऐवजी गुरबाजला देत असल्याने तो मोठा धक्का आहे. रैना आणि त्याचे चाहते IPL 2022 खेळण्याची संधी मिळवण्यासाठी आयपीएलमध्ये सतत बीसीसीआयला विनंती करत आहेत. मात्र अद्याप रैनाला कुठेच संधी मिळाली नाही. जेसन गेल्यानं त्याला जागा मिळेल अशी अपेक्षा होती. मात्र त्याचा अपेक्षाभंग झाला आहे.