IPL 2022 | आयपीएलच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कॅप्टन कोण?
या 15 व्या मोसमात अनेक संघांचे कर्णधार हे नवे आहेत. मात्र महेंद्रसिंह धोनी हा आयपीएलच्या इतिहासातील आतापर्यंतचा सर्वात यशस्वी कर्णधार राहिला आहे, हे आम्ही नाही आकडे सांगतायेत.
मुंबई : आयपीएलच्या 15 व्या मोसमाची (IPL 2022) सुरुवात 26 मार्चपासून होतय. या हंगामातील सलामीची सामना हा 26 मार्चला खेळवण्यात येणार आहे. पहिला सामना हा गतविजेता चेन्नई सुपर किंग्ज (Chennai Super Kings) विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) यांच्यात खेळवण्यात येणार आहे. या वेळेस एकूण 10 संघ ट्रॉफीसाठी आमनेसामने भिडणार आहेत. तर सर्वांच्या नजरा या कर्णधारांच्या कामगिरीवर असणार आहेत.
या 15 व्या मोसमात अनेक संघांचे कर्णधार हे नवे आहेत. मात्र महेंद्रसिंह धोनी (MahendraSingh Dhoni) हा आयपीएलच्या इतिहासातील आतापर्यंतचा सर्वात यशस्वी कर्णधार राहिला आहे, हे आम्ही नाही आकडे सांगतायेत. धोनीने सर्वाधिक सामन्यांमध्ये चेन्नईचं नेतृत्व केलं आहे.
आयपीएलमधील सर्वाधिक यशस्वी कर्णधार
कॅप्टनचं नाव | एकूण सामने | विजयी सामने | पराभूत सामने | विजयी टक्केवारी | किती संघांचं नेतृत्व? |
महेंद्रसिंह धोनी | 204 | 121 | 82 | 59.60 | चेन्नई आणि पुणे |
रोहित शर्मा | 129 | 75 | 50 | 59.68 | मुंबई इंडियन्स |
गौतम गंभीर | 129 | 71 | 57 | 55.42 | दिल्ली आणि कोलकाता |
विराट कोहली | 140 | 64 | 69 | 55.42 | बंगळुरु |
एडम गिलख्रिस्ट | 74 | 35 | 39 | 47.29 | डेक्कन चार्जर्स, सनरायजर्स हैदराबाद |
आयपीएल ट्रॉफी जिंकणारे कर्णधार
रोहित शर्मा - 5 (2013, 2015, 2017, 2019, 2020)
धोनी - 4 (2010, 2011, 2018, 2021)
गौतम गंभीर - 2 (2012, 2014)
शेन वॉर्न- 1 (2008)
एडम गिलक्रिस्ट- 1 (2009)
डेव्हिड वॉर्नर- 1 (2016)