मुंबई : आयपीएलच्या 15 व्या मोसमासाठी (IPL 2022) अवघे काही महिने राहिले आहेत. आयपीएलच्या 15 व्या मोसमासाठी 8 टीम्सने खेळाडू रिलीज आणि रिटेन केले आहेत. यावेळेस मेगा ऑक्शन (IPL Mega Auction 2022) होणार आहे. विशेष म्हणजे या मोसमात एकूण 2 नवे संघ सहभागी होणार असल्याचं निश्चित आहे.  त्यामुळे 15 व्या मोसमात एकूण 10 संघ आमनेसामने असणार आहेत. (ipl 2022 kkr former captain gautam gambhir become mentor of lucknow team before of mega auction)  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

स्पर्धेत 2 नवे संघ सहभागी झाल्याने नवे कोच, कर्णधार आणि नवीन खेळाडू अशा सर्व पदांसाठी संधी उपलब्ध झाल्या आहेत. या निमित्ताने कोलकाताचा माजी कर्णधार गौतम गंभीर (Gautam Gambhir) पुन्हा एकदा आयपीएलमध्ये कमबॅक करत आहे. गंभीर लवकरच नव्या भूमिकेत दिसणार आहे.  


गंभीरला लखनऊ टीममध्ये मोठी जबाबदारी मिळाली आहे. याआधी लखनऊ टीममध्ये झिंबाब्वेचा माजी खेळाडू एंडी फ्लावर प्रशिक्षक म्हणून रुजु झाले आहेत. 


गंभीरकडे कोणती जबाबदारी?


गंभीरची लखनऊ टीमच्या मेन्टॉर (Lucknow Team Mentor) म्हणजेच मार्गदर्शकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.लखनऊचे मालक संजीव गोयंका (Sanjiv Goenka) यांनी क्रिकबझसोबत बोलताना याबाबतची माहिती दिली.


"गंभीर लखनऊ टीममध्ये मेन्टॉर म्हणून जोडला गेला आहे. गंभीर त्या वेळेच्या आघाडीच्या फलंदाजांपैकी एक होता. त्याच्याकडे अनुभव आहे. त्याच्या या अनुभवाचा फायदा लखनऊला मिळेल", असा आशावाद गोंयका यांनी व्यक्त केला. 
 
यशस्वी कर्णधार


गौतम गंभीर आयपीएलच्या इतिहासातील यशस्वी कर्णधारांपैकी एक आहे. गंभीरने केकेआरला आपल्या नेतृत्वात एकूण 2 वेळा विजेतेपद मिळवून दिलं आहे. गंभीरने 2012 आणि 2014 मध्ये केकेआरला विजयी केलं होतं.


गंभीरने आयपीएलमध्ये कर्णधार म्हणून 129 सामने खेळले आहेत. यात त्याने 71 सामन्यात संघाला विजय मिळवून दिला. तर 29 सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला आहे.  


कर्णधार कोण होणार? 


लखनऊच्या कर्णधारपदी केएल राहुलची नियुक्ती होऊ शकते. राहुल गेल्या 2 मोसमापासून पंजाबचं नेतृत्व करतोय. केएल कॅप्टन्सी, विकेटकीपर आणि ओपनर बॅट्समन अशी तिहेरी भूमिका सार्थपणे पार पार पाडतोय.केएलला लखनऊच्या कर्णधारपदाची संधी मिळाली, तर फ्रँचायजीला विकेटकीपरही मिळेल. पंजाबने केएलला रिटेन केलं नाही.