मुंबई : आयपीएलच्या 15 व्या मोसमापासून (IPL 2022) रवींद्र जाडेजाच्या (Ravindra Jadeja)  नव्या इनिंगला सुरुवात होणार आहे. जाडेजा धोनीनंतर आता चेन्नई सुपर किंग्सचं नेतृत्व करणार आहे. या15 व्या मोसमातील पहिला सामन्यात चेन्नई विरुद्ध कोलकाता (CSK vs KKR) आमनेसामने आहे. जाडेजाच्यान नावावर या सामन्यासाठी मैदानात उतरताच एका मोठ्या विक्रमाची नोंद होणार आहे. जाडेजा कोणत्याही संघांचं नेतृत्व न करता खेळाडू म्हणून सर्वाधिक सामने खेळणाऱ्या खेळाडूंपैकी एक ठरणार आहे. (ipl 2022 kkr vs csk chennai super kings captain ravindra jadeja will set unique record as a captain against kolkata knight riders) 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जाडेजाने आतापर्यंत आयपीएलमध्ये राजस्थान, गुजरात, कोचच्ची आणि चेन्नईचं प्रतिनिधित्व केलंय. जाडेजाने आतापर्यंत आयपीएलमध्ये एकूण 200 सामने खेळले आहेत. जाडेजाशिवाय या यादीत रॉबिन उथप्पा 193 सामन्यांसह दुसऱ्या, एबी डीव्हीलियर्स (184) तिसऱ्या आणि अंबाती रायुडू (175)  सामन्यांसह चौथ्या स्थानी विराजमान आहेत.


चेन्नईचा शानदार रेकॉर्ड 


चेन्नई आयपीएलच्या इतिहासातील सर्वात दुसरी यशस्वी टीम आहे. चेन्नईने 4 वेळा आयपीएल विजेतेपद पटकावलंय.  या मोसमापासून जाडेजा चेन्नईचं नेतृत्व करणार आहे. त्यामुळे धोनीने कायम राखलेली चेन्नईच्या शानदार कामगिरीची परंपरा कायम ठेवण्याचं आव्हान जाडेजासमोर असणार आहे.