IPL 2022 | मुंबई इंडियन्सच्या स्टार गोलंदाजाविरोधात बीसीसीआयची मोठी कारवाई
मुंबईला मोठा झटका बसला आहे. टीमचा प्रमुख गोलंदाज अडचणीत सापडला आहे.
मुंबई : कोलकाता नाईट रायडर्सने (Kolkata Knight Riders) बुधवारी मुंबईवर (Mumbai Indians) 5 विकेट्सने दणदणीत विजय मिळवला. मुंबईचा हा सलग तिसरा पराभव ठरला. या पराभवानंतर मुंबईवर जोरदार टीका झाली. या पराभवानंतर मुंबईला मोठा झटका बसला आहे. टीमचा प्रमुख गोलंदाज जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) अडचणीत सापडला आहे. (ipl 2022 kkr vs mi jasprit bumrah and nitish rana violation of ipl code of conduct level 1 rule)
बुमराहने पुण्यात कोलकाता नाइट रायडर्सविरुद्धच्या सामन्यात आयपीएल आचारसंहितेचं उल्लंघन केलं. बुमराहकडून आयपीएलच्या लेव्हल 1 च्या नियमांचं उल्लंघन झालं. बुमराहने केलेली चूक स्वीकारली आहे. लेव्हल 1 नियमांचं उल्लंघन करणाऱ्या विरुद्ध अंतिम निर्णय घेण्याचा अधिकार हा मॅच रेफरी म्हणजे सामनाधिकाऱ्याला असतो, अशी माहिती बीसीसाआयने दिली.
नितीश राणावर दंडात्मक कारवाई
दुसऱ्या बाजूला केकेआरचा बॅट्समन नितीश राणानेही (Nitish Rana) आयपीएलच्या लेव्हल वनच्या नियमांचं उल्लंघन केलं. यामुळे नितीशवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.
नितीशच्या एकूण मॅच फीच्या 10 टक्के रक्कम ही दंड म्हणून वसुलण्या येणार आहे. मात्र बुमराहला समज देऊन सोडण्यात आलं आहे. दरम्यान या दोघांनी कोणत्या नियमांचं उल्लंघन केल, हे बीसीसीआयने स्पष्ट केलेलं नाही.