मुंबई : सामना जिंकण्याच्या टप्प्यात असताना एकदम वेळ बदलली आणि मॅच फिरली. मधल्या टप्प्यात आम्हाला दबाव निर्माण करता आला नाही आणि सगळा खेळ बिघडला म्हणत के एल राहुलने निराशा व्यक्त केली. यासोबत फलंदाजांवरही थोडा संतापल्याचं पाहायला मिळालं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील 31 वा सामना बंगळुरू विरुद्ध लखनऊ झाला. या सामन्यात बंगळुरूने 18 धावांनी लखनऊवर विजय मिळवला. चांगली सुरुवात करूनही मधल्या ओव्हरमधील खराब कामगिरीचा फटका टीमला बसला आणि सामना हातून गेला. 


फाफ ड्यु प्लेसिसचं शतक हुकलं. 64 बॉलमध्ये त्याने 96 धावांची खेळी केली. शाहबाज अहमदने 26 आणि मॅक्सवेलने 23 धावा केल्या. कोहली गोल्डन डकआऊट झाला. बंगळुरूने 6 विकेट्स गमावून 181 धावा केल्या. लखनऊ टीमला 8 विकेट्स गमावून 163 धावा करण्यात यश आलं.


कुठे चुकलं गणित?


सामना संपल्यानंतर राहुल म्हणाला, 'मला वाटतं की पहिल्या ओव्हरमध्ये 2 विकेट्स घेऊन चांगली सुरुवात केली, पण नंतर पॉवरप्लेमध्ये 50 धावा करता आल्या. अजून चांगली करणं अपेक्षित होतं पण तिथे आम्ही कमी पडलो. मला वाटतं या मैदानात धावा करणंही कठीण होतं. पण मला असं वाटतं की आम्ही त्यांना ज्यादा धावा दिल्या आणि तिथेच सगळं गणित चुकलं. 


आम्हाला सुरुवातीला विकेट्स मिळाल्या. मधल्या फळीमध्ये दबाव निर्माण करण्यात आम्ही कमी पडलो आणि त्याचा फायदा बंगळुरूने घेतला. टीममधील सुरुवातीच्या फलंदाजांकडून खूप अपेक्षा होत्या मात्र ते चांगल्या धावा करू शकले नाहीत तिथे कमी पडल्याने नाराजीही के एल राहुलने व्यक्त केली.