मुंबई : आयपीएलच्या 15 हंगामाला 26 मार्चपासून सुरुवात होत आहे. 26 मार्च रोजी पहिला सामना चेन्नई विरुद्ध कोलकाता असणार आहे. यंदाचा हंगाम अनेक अर्थांनी खास असणार आहे. टायटल स्पॉन्सर म्हणून यंदा टाटा असणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यंदाच्या आयपीएलमध्ये 10 संघ असणार आहेत. मुंबईतील 3 स्टेडियम आणि पुण्यातील एका स्टेडियमवर हे सामने होणार आहेत. यंदा 10 संघ मिळून 70 सामने होणार आहेत. दोन गटांमध्ये 10 संघांची विभागणी केली आहे. यंदाच्या 15 व्या हंगामात काही संघांचे कर्णधारही बदलले आहेत. त्यामुळे 10 संघ आणि त्याचे नवे कर्णधार कोण आहेत जाणून घेऊया.


मुंबई- रोहित शर्मा - वय 34
चेन्नई - महेंद्रसिंह धोनी - वय 40
बंगळुरू- फाफ ड्यु प्लेसिस -वय 37
दिल्ली - ऋषभ पंत - वय 24
पंजाब- मयंक अग्रवाल - वय 31
राजस्थान- संजू सॅमसन - वय 27
हैदराबाद- केन विल्यमसन - वय 31
लखनऊ- के एल राहुल - वय 29
गुजरात- हार्दिक पांड्या - वय 28
कोलकाता- श्रेयस अय्यर - वय 27


IPL 2022 : मुंबईला मोठा धक्का, स्फोटक फलंदाजाला दुखापत


यंदाच्या आयपीएलमध्ये सूर्यकुमार यादव, ऋतुराज गायकवाड, दीपक चाहर खेळणार की नाही याबाबत अजूनही प्रश्नचिन्ह असणार आहे. तर हार्दिक पांड्या गोलंदाजी करणार का? हे सगळ्यांसाठी सरप्राइज असणार आहे.