मुंबई : चेन्नई सुपर किंग्जचा (CSK) माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने (Mahendra Singh Dhoni) सातव्या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्सविरुद्ध (LSG) 6 चेंडूत नाबाद 16 धावांची खेळी केली. यासह धोनीने टी-20 क्रिकेटमध्ये 7 हजार धावा पूर्ण केल्या. या सामन्यापूर्वी धोनीला 7 हजार धावां पूर्ण करण्यासाठी 15 रन्सची आवश्यकता होती. आता हा आकडा गाठणारा तो सहावा भारतीय खेळाडू ठरला आहे. (ipl 2022 lsg vs csk chennai super kings ms dhoni complete 7 thousands t20 runs) 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

धोनीने त्याच्या 349 व्या टी 20 सामन्यात 7 हजार धावांचा टप्पा पार केला. धोनीने 308 डावात ही कामगिरी केली. यादरम्यान धोनीने 28 अर्धशतकं झळकावली आहेत. धोनीची नॉटआऊट 84 ही त्याची सर्वोच्च वैयक्तिक खेळी आहे.


दरम्यान चेन्नई सुपर किंग्सने लखनऊ सुपर जायंट्सला विजयासाठी 211 धावांचे मजबूत आव्हान दिले आहे. चेन्नईने निर्धारित 20 ओव्हरमध्ये 7 विकेट्स गमावून 210 धावा केल्या. चेन्नईकडून सलामीवीर रॉबिन उथ्प्पाने सर्वाधिक 50 धावांची अर्धशतकी खेळी केली.