IPL 2022 : आयपीएल 2022  (IPL 2022) ची उत्सुकता क्रिकेट चाहत्यांना लागली आहे. यंदाच्या हंगामात ८ ऐवजी १० संघ सहभागी होणार आहेत. त्यामुळे हा हंगाम किती धमाकेदार असणार याचा अंदाज येत आहे. या हंगामात अहमदाबाद आणि लखनऊ हे दोन नविन संघ सहभागी होणार आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अहमदाबाद आणि लखनऊ संघ कोणत्या नावाने आयपीएलमध्ये प्रवेश करणार याची चाहते आतुरतेने वाट पाहत होते. आता लखनऊ संघाने नाव जाहीर करून ही प्रतीक्षा संपवली आहे.


लखनऊ संघाचं नाव जाहीर
लखनौचा संघ यंदाच्या आयपीएलमध्ये खास नाव घेऊन प्रवेश करणार आहे. याची अधिकृत घोषणा लखनऊ फ्रँचाईझीने केली आहे. आयपीएल २०२२ च्या हंगामात लखनऊ संघ 'लखनऊ सुपर जायंट्स'  (Lucknow Super Giants) या नावाने उतरणार आहे. लखनऊ संघाची मालकी संजीव गोएंका  (anjiv Goenka) यांच्याकडे आहे.




लखनऊ संघात 'हे' तीन खेळाडू 
लखनऊ संघाने पहिल्या 3 खेळाडूंची निवड केली आहे. के एल राहुलने गेल्या हंगामात दमदार कामगिरी केली होती. त्यामुळे लखनऊने बाजी मारत त्याला आपल्या फ्रान्चायझीमध्ये घेतलं आहे. 


के एल राहुलसाठी अहमदाबाद आणि आरसीबी संघ देखील या स्पर्धेत होता. मात्र लखनऊ संघाने के एल राहुलला आपल्याकडे घेतलं आहे. 
के एल राहुल लखनऊ संघाचं नेतृत्व करण्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे. मार्कस स्टोइनिस आणि रवि बिश्नोई  अशा दोन खेळाडूंना देखील लखनऊ संघाने घेतलं आहे. लखनऊच्या कर्णधारपदाचं नाव लवकरच घोषित केलं जाण्याची शक्यता आहे.