IPL 2022, CSK vs KKR | धोनीची फटकेबाजी, चेन्नईकडून कोलकालाता विजयासाठी 132 धावांचे आव्हान
चेन्नई सुपर किंग्सने (Chennai Super Kings) कोलकाताला नाईट रायडर्सला (Kolkata Knight Riders) विजयासाठी 132 धावांचे आव्हान दिले आहे.
मुंबई : चेन्नई सुपर किंग्सने (Chennai Super Kings) कोलकाताला नाईट रायडर्सला (Kolkata Knight Riders) विजयासाठी 132 धावांचे आव्हान दिले आहे. चेन्नईने निर्धारित 20 ओव्हरमध्ये 5 विकेट्स गमावून 131 धावा केल्या. चेन्नईकडून महेंद्रसिंह धोनीने (Mahedra Singh Dhoni) सर्वाधिक नाबाद 50 रन्स केल्या. तर कॅप्टन रवींद्र जाडेजाने (Ravindra Jadeja) 26 धावांची संयमी खेळी केली. कोलकाताकडून उमेश यादवने सर्वाधिक 2 विकेट्स घेतल्या. (ipl 2022 match 1 csk vs kkr chennai super kings sets 132 runs target for winning kolkkata knight riders dhoni score fifty at wankhede stadium mumbai)
कोलकाता नाईट रायडर्सचे अंतिम 11 खेळाडू - श्रेयस अय्यर (कर्णधार), वेंकटेश अय्यर, अजिंक्य रहाणे, नीतीश राणा, सॅम बिलिंग्स, आंद्रे रसेल, शेल्डन जॅक्सन, सुनील नरेन, शिवम मावी, उमेश यादव आणि वरुण चक्रवर्ती.
सीएसकेची प्लेइंग इलेव्हन - रवींद्र जाडेजा (कॅप्टन), ऋतुराज गायकवाड, डेवन कॉनवे, रॉबिन उथप्पा, अंबाती रायुडू, एमएस धोनी, शिवम दुबे, ड्वेन ब्रावो, तुषार देशपांडे, मिचेल सँटनर आणि एडम मिल्न.