बंगळुरु | आयपीएलच्या 15 व्या मोसमासाठीचा मेगा लिलाव (IPL 2022 Mega Auction) बंगळुरु येथे सुरु आहे. या लिलावादरम्यान मोठी घटना घडली आहे. या मेगा ऑक्शनचे ऑक्शनर ह्यूज एडमीड्स (Auctioneer Hugh Edmeades) कार्यक्रमादरम्यान बेशुद्ध होऊन खाली पडले. यामुळे एकच खळबळ उडाली. काही मिनिटांपूर्वी प्रकृती ठीक असलेले ह्यूज अचानक एकाएकी पडल्याने नक्की काय झालं, असा सर्वांचाच गोंधळ उडाला. दरम्यान त्याने नक्की काय झालं, याबाबत अजून समजू शकलेलं नाही. (ipl 2022 mega acution day 1 auctioneer hugh edmeades collapses during auction)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

श्रीलंकेचा गोलंदाज वनिंदु हसरंगा याच्यावर बोली सुरु होती. हसरंगावर 10 कोटी 75 लाख रुपयांवर ही बोली पोहचली होती. या दरम्यान हा सर्व प्रकार घडला. या सर्व प्रकारामुळे लंच ब्रेक घेऊन हा लिलाव काही वेळेसाठी थांबवण्यात आल्याचं म्हटलं जात आहे. 



दरम्यान ह्यूज एडमीड्स यांना मेडिकल चेकअपसाठी नेण्यात आलं आहे. त्यांची प्रकृती स्थिर आहे. थोड्यात वेळात म्हणजेच दुपारी 3 वाजून 30 मिनिटांनी  हा लिलाव पुन्हा सुरु होईल, अशी माहिती महिला सूत्रसंचालिकेने दिली.