मुंबई : यंदाच्या आयपीएलमधून अनेक दिग्गज खेळाडूंनी माघार घेतली. तर काही खेळाडूंना खेळण्याची संधीच मिळाली नाही. मेगा ऑक्शन 2022 मध्ये असा एक खेळाडू आहे जो शेवटपर्यंत अनसोल्ड राहिला. त्याला कोणत्याच संघाने घेतलं नाही. त्यानंतर या क्रिकेटपटूनं BCCI कडे कुठेतरी खेळण्याची संधी द्या अशी विनवणी केली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

10 टीमपैकी एकाही टीमने या क्रिकेटपटूवर बोली लावली नाही. अगदी अजिंक्य रहाणेवरही बोली लागली मात्र या खेळाडूचे हात सुकेच राहिले. आयपीएलमध्ये धोनीच्या संघातून खेळणारा हा खेळाडू आता एकटा पडला आहे. धोनीचा खास मित्र सुरेश रैनाला मेगा ऑक्शनमध्ये कोणीच संधी दिली नाही. 


रैनाला का केलं जातंय इग्नोर?
मेगा ऑक्शन 2022 मध्ये सुरेश रैनाला 10 पैकी एकाही संघाने भाव दिला नाही. त्याच्यावर कोणत्याही संघाने बोली लावली नाही. पहिल्यांदाच सुरेश रैना ऑक्शनमध्ये अनसोल्ड राहिला आहे. CSK नेही त्याच्यावर बोली लावली नाही. 


2008 पासून सुरेश रैना चेन्नई संघाशी जोडला होता. मात्र यंदा CSK ने रैनाची साथ सोडली. त्यानंतर रैनाला कोणीच आपल्या संघात घेतलं नाही. 205 सामन्यात केवळ 5528 धावा करण्यात यश आलं आहे. रैनाच्या पुढे विराट, शिखर धवन, रोहित शर्मा तीन धडाकेबाज फलंदाज आहेत.


रैनाची BCCI ला विनंती
रैनाने बीसीसीआयला कळकळीची विनंती केली आहे. आयपीएलमध्ये 10 पैकी एकाही संघाने माझ्यावर बोली लावली नाही. आता कमीत कमी आंतरराष्ट्रीय स्तरावरील बाहेरच्या लीगमध्ये खेळण्याची परवानगी BCCI ने द्यावी अशी विनंती केली आहे. सुरैश रैनाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 



CPL, BBL सारख्या लीगमध्ये खेळण्याची परवानगी द्यावी असं रैनाचं म्हणणं आहे. IPL खेळणाऱ्या खेळाडूंना इतर लीगमध्ये सहभागी होता येत नाही. त्यामुळे आता रैनाच्या ह्या विनंतीवर BCCI खरंच विनंती करणार का? हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.