मुंबई : क्रिकेट चाहत्यांना आता आयपीएलच्या 15 व्या मोसमाचं (IPL 2022) वेध लागलंय. या 15 हंगामाची सुरुवात 26 मार्चपासून होतेय. मुंबई इंडियन्स (Mumbai Indians)  आयपीएलच्या इतिहासातील यशस्वी टीम राहिली आहे. या 15 सीजनसाठी मुंबईचा कॅप्टन रोहित शर्माने (Rohit Sharma) जसप्रीत बुमराहसारखाच (Jasprit Bumrah) घातक गोलंदाज आणला आहे. या खेळाडूत भेदक गोलंदाजीच्या जोरावर क्षणात सामना बदलण्याची क्षमता आहे. विशेष म्हणजे या बॉलरने आपल्या टीमला वर्ल्ड कप जिंकून दिला आहे. (ipl 2022 mi mumbai indians captain rohit sharma jofra archer japrit bumrah)
 
मुंबई टीममध्ये या खेळाडूची एन्ट्री


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबईने आपल्या ताफ्यात इंग्लंडच्या (England) जोफ्रा आर्चरचा (Jofra Archer) समावेश केला आहे. मुंबईने आर्चरसाठी 8 कोटी मोजले आहेत.


आर्चरच्या भेदक गोलंदाजाचा सामना करणं हे खायचं काम नाही. आर्चरच्या बॉलिंगसमोर अनेक फलंदाज अपयशी ठरतात. आता आर्चर मुंबईत सहभागी झाल्याने प्रतिस्पर्धी संघात भितीचं वातावरण आहे. 


तसेच मुंबईत आधीपासून 'यॉर्करकिंग' जसप्रीत बुमराह आहे. त्यामुळे या मोसमात ही बुमराह-आर्चर जोडी कशी कामगिरी करते, याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.