मुंबई : मुंबई इंडियन्सला (Mumbai Indians) आयपीएलच्या 15 व्या मोसमात (IPL 2022) सलग 8 सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला. मुंबईसाठी हा मोसम फार वाईट राहिला. मुंबईचं या हंगामातील आव्हानही संपुष्टात आलं. मुंबईच्या खेळाडूंना यावेळेस चमकदार कामगिरी करता आली नाही. मुंबईने ओपनर इशान किशनसाठी 15 कोटी 25 लाख रुपये मोजले. मात्र इशानला त्याचा चांगला परतावा देता आला नाही. (ipl 2022 mi mumbai indians opner ishan kishan disappointed to cricket fans)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

इशानने 15 व्या हंगामातील 8 सामन्यांमध्ये 199 धावा केल्या आहेत. या हिशोबाने इशानच्या एका रनची किंम ही 7 लाख 66 हजार इतकी आहे.


इशानने पहिल्या 2 सामन्यांमध्ये अनुक्रमे नाबाद 81 आणि 54 धावा केल्या. मात्र यानंतर त्याने फॉर्म गमावला.  इशानने मागील 6 सामन्यात अनुक्रमे पिछली छह पारियों में रहे फ्लॉप 14, 26, 3, 13, 0 आणि 8 धावा केल्या.


इशानने आयपीएलमध्ये गुजरात लायन्सकडून पदार्पण केलं होतं. त्यानंतर मुंबईने 2018 मध्ये इशानला आपल्यात घेतलं. इशानने 2020 मध्ये आयपीएलच्या 13 व्या मोसमात शानदार कामगिरी केली होती. त्याने या मोसमात मुंबईकडून सर्वाधिक 516 धावा केल्या होत्या.