मुंबई : मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) दिल्ली कॅपिट्ल्सवर (Delhi Capitals) 5 विकेट्सने विजय मिळवला आहे. दिल्लीने मुंबईला विजयासाठी 160 धावांचं आव्हान दिलं होतं. मुंबईने हे विजयी आव्हान 5 विकेट्सच्या मोबदल्यात आणि 5 बॉल राखून पूर्ण केलं. मुंबईच्या विजयामुळे दिल्लीचं या मोसमातील आव्हान संपुष्टात आलं. तर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु प्लेऑफमध्ये पोहचणारी चौथी टीम ठरली. (ipl 2022 mi vs dc mumbai indians beat delhi 5 wickets and rcb become 4th team who qualified to playoff)  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबईकडून इशान किशनने सर्वाधिक 48 धावा केल्या. डेवाल्ड ब्रेविसने 37 रन्स काढल्या. तर टीम डेव्हिडने 34 धावांची झंझावाती खेळी केली. टिळक वर्माने 21 धावांचं योगदान दिलं. तर रमनदीप सिंह आणि डॅनियल सॅम्स या जोडीने मुंबईला विजय मिळवून दिला. 


दिल्लीकडून शार्दुल ठाकूर आणि एनरिच नॉर्खिया या दोघांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या. तर कुलदीप यादवने 1 विकेट मिळवली.


दिल्ली कॅपिटल्सची प्लेइंग इलेव्हन : ऋषभ पंत (कॅप्टन-विकेटकीपर), पृथ्वी शॉ, डेविड वॉर्नर, सरफराज खान, मिचेल मार्श, रोवमन पावेल, अक्षर पटेल, शार्दुल ठाकुर, कुलदीप यादव, खलील अहमद आणि एनरिक नॉर्खिया. 


मुंबई इंडियन्सची 'पलटण' : रोहित शर्मा (कॅप्टन), इशान किशन, तिलक वर्मा, डेवाल्ड ब्रेविस, रमनदीप सिंह, टिम डेविड, डेनियल सॅम्स, मयंक मार्कंडे, ऋतिक शौकीन, जसप्रीत बुमराह आणि रायली मेरेडिथ.